सुपरफास्ट नाशिक

ताज्या, दर्जेदार आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी

घटना-घडामोडींचा डिजिटल आरसा

आजच्या वेगवान युगात माहिती हीच शक्ती आहे. पण, माहितीच्या या महाजालात 'सत्य' आणि 'वेग' यांचा मेळ घालणे आव्हानात्मक असते. हेच आव्हान स्वीकारून 'सुपरफास्ट नाशिक' (Superfast Nashik) हे न्यूज वेबपोर्टल वाचकांच्या सेवेत रुजू झाले आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यासह महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील महत्वाची बातमी वाचकांपर्यंत थेट पोहोचवणे, हेच आमचे एकमेव ध्येय आहे.

आमच्याविषयी

एबीव्ही मल्टीमिडीया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्यावतीने 'सुपरफास्ट नाशिक' हे वेब न्यूज पोर्टल वाचकांच्या सेवेत आणण्यात आले आहे. 'सुपरफास्ट नाशिक' हे नाशिककरांचा हक्काचा आवाज आहे. राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक प्रश्न, कृषी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रांतील घडामोडींवर आम्ही सूक्ष्म लक्ष ठेवून असतो. पारदर्शक तसेच विकासात्मक पत्रकारिता आणि सामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द ही आमची ओळख आहे.

आमची वैशिष्ट्ये:

  • • सुपरफास्ट अपडेट्स:
    घडणारी कोणतीही घटना असो, तिचे सर्वात जलद अपडेट्स तुम्हाला आमच्या पोर्टलवर मिळतील.
  • • सत्यता आणि विश्वासार्हता:
    बातमी देण्याच्या घाईत आम्ही तथ्यांशी तडजोड करत नाही. प्रत्येक बातमीची शहनिशा करूनच ती प्रसिद्ध केली जाते.
  • • प्रश्नांना वाचा:
    गोदाकाठच्या समस्या असो की ग्रामीण भाग किंवा राज्यातील महत्वाचे प्रश्न असो की सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या समस्या या सर्वांना आम्ही डिजिटल व्यासपीठ मिळवून देतो.
  • • वाचकस्नेही मांडणी:
    मोबाईल असो वा संगणक, आमचे पोर्टल अतिशय सुटसुटीत आणि वाचण्यास सोपे आहे, जेणेकरून वाचकाला कमी वेळात महत्त्वाची माहिती मिळेल.

आमचे उद्दिष्ट

नाशिक ही केवळ ऐतिहासिक नगरी नसून ती आता प्रगत होत चाललेली 'स्मार्ट सिटी' आहे. या बदलत्या नाशिकची गती आणि प्रगती जगासमोर मांडणे, तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटींवर बोट ठेवून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करणे, हे 'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य उद्दिष्ट आहे.

आमच्याशी कनेक्ट व्हा

सोशल मीडियाच्या युगात आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, एक्स (ट्विटर) आदींच्या माध्यमातूनही तुमच्याशी जोडले गेलो आहोत. नाशिकच्या विकासात आणि प्रवासात आमचा वाचक हाच आमचा खरा मार्गदर्शक आहे.

लवकरच ई पेपर आणि साप्ताहिक

बदलत्या काळाचा वेध घेऊन लवकरच 'सुपरफास्ट नाशिक' हा डिजीटल ई पेपर वाचकांच्या भेटीला येणार आहे. त्याद्वारे वाचकांना वेब पोर्टलवरील बातम्यांबरोबरच डिजीटल आवृत्ती वाचायला मिळेल.

तसेच, नजिकच्या काळातच साप्ताहिक वाचकांच्या सेवेत येणार आहे. याद्वारे नाशिकचे ज्वलंत प्रश्न मांडण्याबरोबरच अनेकविध बाबींवर अचूक प्रकाश टाकला जाणार आहे.