संपादक – श्री. भावेश वसंतराव ब्राह्मणकर
पत्रकारिता म्हणजे केवळ माहितीचे संकलन नव्हे, तर समाजाच्या परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. माध्यम विश्वात हेच तत्त्व आपल्या लेखणीतून गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सिद्ध करणारे नाव म्हणजे भावेश ब्राह्मणकर.
अनुभवाचा समृद्ध वारसा
भावेश ब्राह्मणकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्र समूहांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. नाशिकमध्ये दै. युवा सकाळ, दै. सकाळ मध्ये त्यांच्या पत्रकारितेला प्रारंभ झाला. त्यानंतर हैदराबाद येथील ई टीव्ही मराठी मध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. नाशिकच्या दै. लोकमतमध्ये त्यांनी वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर प्रदीर्घ काळ दै. महाराष्ट्र टाइम्स मध्ये वरिष्ठ वार्ताहर आणि मुख्य वार्ताहर म्हणून जबाबदारी सांभाळतांना त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीचे अत्यंत बारकाईने वार्तांकन केले.
राजधानी नवी दिल्लीत दै. लोकमतमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. पर्यावरण, संरक्षण, विज्ञान यासह विविध क्षेत्रात त्यांनी भरघोस लेखन केले आहे. इंडिया दर्पण माध्यम समुहातही त्यांनी संचालक व संपादक म्हणून कामकाज केले आहे. आता एबीव्ही मल्टीमिडीया प्रायव्हेट लिमिटेडच्या 'सुपरफास्ट नाशिक' या डिजीटल माध्यमात ते मुख्य संपादक म्हणून ते जबाबदारी पाहत आहेत. प्रिंट, रेडिओ, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल मीडियातील त्यांचा अनुभव आता मल्टीमिडीया युगात वाचकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
अभ्यासू आणि परखड शैली
भावेश ब्राम्हणकर यांची ओळख एक 'अभ्यासू पत्रकार' अशी आहे. गुंतागुंतीचे प्रशासकीय विषय, राजकारणातील पडद्यामागच्या हालचाली, विज्ञान व पर्यावरण क्षेत्रातील घडामोडी, संरक्षण क्षेत्रातील नवनवीन घटना आदींवरील त्यांचे विश्लेषण नेहमीच सखोल आणि वस्तुनिष्ठ असते.
केवळ समस्या मांडणेच नव्हे, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रशासनाला प्रवृत्त करणारी त्यांची लेखणी नाशिककरांच्या परिचयाची आहे.
डिजिटल क्रांतीचे सारथी
बदलत्या काळाची पावले ओळखून त्यांनी डिजिटल पत्रकारितेत पाऊल ठेवले. 'सुपरफास्ट नाशिक' (Superfast Nashik) या पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी नाशिककरांना जलद, अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांचे एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.
'फेक न्यूज'च्या जमान्यात सत्यता पडताळून पाहणारी पत्रकारिता कशी असावी, याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कामातून घालून दिला आहे.
सामाजिक बांधिलकी आणि दृष्टीकोन
बातमीदारीच्या पलीकडे जाऊन पर्यावरण, ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन आणि नागरी हक्क यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. एक सजग नागरिक आणि संवेदनशील पत्रकार म्हणून त्यांनी नेहमीच जनहिताला प्राधान्य दिले आहे.
"विकासात्मक पत्रकारितेवर माझा नेहमीच भर राहिला आहे. हे क्षेत्र म्हणजे सामाजिक जबाबदारी आहे. सत्याचा शोध घेणे आणि तो निर्भीडपणे मांडणे यालाच मी प्राधान्य देतो. 'सुपरफास्ट नाशिक'च्या माध्यमातून वाचकांना ताज्या, दर्जेदार आणि विश्वासार्ह बातम्या देण्यासाठी आमची संपूर्ण टीम कार्यरत आहे."