अंबानींची कंपनी देणार गुंतवणूक सल्लाही... इतक्या रुपयात मिळेल सेवा...

Share:
Main Image
Last updated: 03-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३ फेब्रुवारी - देशातील सामान्य नागरिकाला केवळ बचतकर्ता न ठेवता त्याला 'समजूतदार गुंतवणूकदार' बनवण्यासाठी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक यांच्या संयुक्त उपक्रमाने आज महत्त्वाचे पाऊल उचलले. 'जिओब्लॅकरॉक पर्सनलाइज्ड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हाइज' या डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला असून, यामुळे आता सर्वसामान्यांना अतिशय माफक दरात वैयक्तिक गुंतवणूक सल्ला उपलब्ध होणार आहे.

​बचतकर्त्यांचा देश आता 'गुंतवणूकदारांचा' देश होणार
​या उपक्रमाबाबत माहिती देताना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ईशा एम. अंबानी म्हणाल्या, "विकसित भारत २०४७ च्या दिशेने वाटचाल करताना प्रत्येक भारतीयाची आर्थिक मजबुती आवश्यक आहे. जिओची डिजिटल ताकद आणि ब्लॅकरॉकचा जागतिक अनुभव यांच्या संगमातून आम्ही जागतिक दर्जाचा गुंतवणूक सल्ला घराघरात पोहोचवत आहोत."

​सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि शुल्क:
​आतापर्यंत वैयक्तिक गुंतवणूक सल्ला हा केवळ श्रीमंत वर्गापुरता मर्यादित होता, मात्र जिओ-ब्लॅकरॉकने तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा केला आहे:

​सुरुवात: अवघ्या ₹१०,००० पासून गुंतवणूक करता येणार.
​किमान शुल्क: वार्षिक सल्ला शुल्क केवळ ₹३५० पासून सुरू.
​मोफत ऑफर: पहिले ३ महिने ही सेवा पूर्णपणे मोफत असेल.
​मोठ्या गुंतवणुकीसाठी: १ लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवर वार्षिक ०.३५% शुल्क.
​अद्ययावत तंत्रज्ञान: 'Aladdin' या जागतिक दर्जाच्या रिस्क अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्मचा वापर करून पोर्टफोलिओचे वेळोवेळी 'री-बॅलन्सिंग' केले जाईल.

​कुठे उपलब्ध होणार?
​ही सेवा सध्या 'जिओफायनान्स' (JioFinance) अ‍ॅपवर उपलब्ध असून, लवकरच ती कोट्यवधी युजर्स असलेल्या 'MyJio' अ‍ॅपवरही सुरू केली जाणार आहे.

​"भारताने आर्थिक समावेशनात (Financial Inclusion) मोठी प्रगती केली आहे, आता आमचे लक्ष 'वेल्थ इन्क्लूजन'वर आहे. प्रत्येक भारतीयाला संपत्ती निर्मितीची समान संधी मिळायला हवी."
— मार्क पिल्ग्रिम, सीईओ, जिओब्लॅकरॉक

Advertisement

Comments

No comments yet.