कुठल्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजवंदन? बघा संपूर्ण यादी...

Share:
Main Image
Last updated: 22-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ जानेवारी - भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ २६ जानेवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच वेळी सकाळी ९:१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य सोहळ्याचे गांभीर्य आणि निमंत्रितांची उपस्थिती विचारात घेऊन, राज्य सरकारने सकाळी ८:३० ते १० या वेळेत अन्य कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

राजशिष्टाचार विभागाचे स्पष्ट निर्देश
राजशिष्टाचार विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय कार्यक्रमांना सर्व निमंत्रितांना उपस्थित राहता यावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे:
 * वेळेचे बंधन: कोणत्याही कार्यालयाला किंवा संस्थेला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ करायचा असल्यास, त्यांनी तो सकाळी ८:३० च्या पूर्वी किंवा १०:०० वाजेनंतर संपन्न करावा.
 * मुख्य सोहळा: सकाळी ८:३० ते १०:०० या दरम्यान कोणताही समांतर शासकीय किंवा निमशासकीय सोहळा आयोजित करता येणार नाही.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन
प्रजासत्ताक दिनाचा मुंबईतील मुख्य सोहळा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल आणि त्यानंतर दिमाखदार संचलन (परेड) पार पडेल.

विभागीय व जिल्हा स्तरावरील नियोजन
राज्यातील विभागीय मुख्यालय आणि जिल्हा स्तरावरही ध्वजवंदनाचे नियोजन करण्यात आले आहे. ठराविक ठिकाणी त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाईल. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र एकाच वेळी साजरा व्हावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Advertisement

अखेर भरत गोगावले यांना संधी
रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते होणार आहे.  सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी परिपत्रक काढून नावे जाहीर केली आहेत. गेल्यावर्षी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला होता. या दोघांत पालकमंत्रीपदाचा वाद सुरू आहे. त्यांना आलटून पालटून संधी देण्याचे धोरण आहे की, खरेच लवकरच गोगावले यांना पालकमंत्री केले जाते, हे लवकरच कळेल.

Advertisement

Comments

No comments yet.