रेल्वे मंत्र्यांकडून या कॉरिडॉरची घोषणा... नाशिकच्या औद्योगिक, ग्रामीण विकासाला मोठे बळ मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 04-Sep-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ४ सप्टेंबर - केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी सूरज-डानकुनी ईस्ट-वेस्ट रेल्वे कॉरिडॉर (Surat-Dankuni East-West Corridor) महाराष्ट्रातील आजवर रेल्वेसेवेपासून वंचित राहिलेल्या अनेक भागांना जोडण्यासाठी आणि राज्याचा औद्योगिक-ग्रामीण विकास सुसाट करण्यासाठी विशेष तयार केला जात आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रमुख क्षेत्रांना थेट आणि उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याची महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

दिल्लीहून व्हिडिओ लिंकद्वारे मुंबई-कोकण मार्गावरील नवीन 'सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवताना रेल्वेमंत्र्यांनी ही घोषणा केली.

?s=20

प्रवासी आणि माल वाहतुकीचा डबल धमाका

अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, प्रस्तावित सुरत ते डानकुनी (पश्चिम बंगाल) दरम्यानच्या या कॉरिडॉरमध्ये स्वतंत्र मालवाहतूक (Dedicated Freight Services) आणि प्रवासी रेल्वे सेवा या दोन्हीचा समावेश असेल.

नाशिकला मोठा फायदा: या कॉरिडॉरमुळे नाशिक जिल्हा थेट गुजरात, मध्य भारत आणि पूर्व भारताशी रेल्वे जाळ्याने जोडला जाईल.

उद्योग आणि निर्यातीला गती: नाशिकमधील ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी-प्रक्रिया (Agro-processing) आणि वाईन उद्योगांना आपला माल थेट पूर्व व उत्तर भारतातील बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे, जलद आणि किफायतशीर ठरेल.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आराखडा

पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्व आणि पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर एकत्र जोडून त्यांना नव्या औद्योगिक विकास क्षेत्रांशी (IDZ) कनेक्ट करण्याची सूचना केली होती. या सूचनेचा विचार करून रेल्वेच्या संपूर्ण टीमने या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरची डिझाईन तयार केली आहे.

"हा कॉरिडॉर अशा प्रकारे डिझाईन केला जात आहे की, महाराष्ट्रातील ज्या भागात आजवर रेल्वे पोहोचू शकली नव्हती किंवा जोडली गेली नव्हती, त्या भागांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल," असे रेल्वेमंत्र्यांनी नमूद केले.

जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) आणि उत्तर महाराष्ट्राचे लॉजिस्टिक्स हब

पूर्व आणि पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पूर्ण झाल्यामुळे 'जेएनपीटी' (JNPT) बंदरातून देशातील उत्तर, पूर्व आणि मध्य भागात माल पोहोचवणे अधिक सुलभ झाले आहे. त्यातच सुरत-डानकुनी कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यावर नाशिकसह उत्तर महाराष्ट्र हा देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स आणि वाहतूक हब (Logistics Hub) म्हणून उदयास येईल.

नियमित रेल्वे मार्गावरील मालगाड्यांचा ताण कमी झाल्याने प्रवासी गाड्यांनाही प्राधान्य मिळेल, ज्यामुळे नाशिककरांचा लांब पल्ल्याच्या प्रवासाचा वेळ वाचणार असून गाड्यांच्या वक्तशीरपणात मोठी सुधारणा होणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.