महाराष्ट्रात नंबर १ कोण? जिओ, एअरटेल की Vi? या कंपनीचे ग्राहक अवघ्या ९ लाखांवरून थेट ४ कोटींवर...

Share:
Main Image
Last updated: 04-Sep-2026

अक्षय काळे, (मुंबई) ४ सप्टेंबर - सप्टेंबर २०१६ मध्ये अवघ्या ९.८ लाख ग्राहकांपासून सुरू झालेला रिलायन्स जिओचा प्रवास जून २०२६ पर्यंत तब्बल ४.४५ कोटींवर (४४४.८ लाख) पोहोचला आहे. गेल्या एका दशकात (१० वर्षांत) जिओने महाराष्ट्राच्या दूरसंचार क्षेत्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला असून, ग्राहकसंख्येत तब्बल ४५.५ पट वाढ नोंदवली आहे. सध्या ४२.७% वायरलेस बाजारहिश्श्यासह जिओ महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अग्रगण्य मोबाईल ऑपरेटर ठरला आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) ताज्या आकडेवारीनुसार, जिओच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे राज्यातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धात्मक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

असा राहिला जिओचा 'सुसाट' प्रवास (सप्टेंबर २०१६ ते जून २०२६):

दोन वर्षांत एअरटेलला पछाडले: बाजारात पाऊल ठेवल्यावर अवघ्या दोन वर्षांत, म्हणजेच ऑगस्ट २०१८ मध्ये जिओने एअरटेलला मागे टाकले.

२०२० पासून 'नंबर १' चे स्थान कायम: सप्टेंबर २०२० मध्ये जिओ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर बनला आणि गेल्या सहा वर्षांपासून हे अव्वल स्थान जिओने समर्थपणे टिकवून ठेवले आहे.

४७.९% चा जबरदस्त CAGR दर: गेल्या १० वर्षांत जिओच्या ग्राहकसंख्येत ४७.९% वार्षिक चक्रवाढ दराने (CAGR) वाढ झाली. याच कालावधीत एअरटेलचा CAGR ९.८% राहिला, तर व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत घट झाली आहे.

जून २०२६ अखेर महाराष्ट्रातील ऑपरेटरनिहाय ग्राहकसंख्या:

'ट्राय'च्या (TRAI) आकडेवारीनुसार, जून २०२६ अखेर महाराष्ट्रात एकूण १०४१.५ लाख (१०.४१ कोटी) वायरलेस कनेक्शन्स नोंदवली गेली आहेत:

ऑपरेटर  ग्राहक संख्या (लाखांमध्ये)  बाजारपेठेतील स्थान
रिलायन्स जिओ (Jio) ४४४.८ लाख (४.४५ कोटी) क्रमांक १ (४२.७% हिस्सा)
भारती एअरटेल (Airtel) ३३७.४ लाख (३.३७ कोटी) क्रमांक २
व्होडाफोन आयडिया (Vi) २०६.४ लाख (२.०६ कोटी) क्रमांक ३
बीएसएनएल (BSNL) ५२.९ लाख (५२.९ लाख) क्रमांक ४
एकूण  १,०४१.५ लाख  १००%

 

एकूण बाजारपेठेचा विस्तार आणि 'मार्केट कॉन्सोलिडेशन'

जिओच्या आगमनानंतर केवळ इतर कंपन्यांचे ग्राहकच वाढले नाहीत, तर महाराष्ट्रातील एकूण डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी क्रांती झाली.

२०१६ मधील ८४९.७ लाख ग्राहकसंख्येच्या तुलनेत २०२६ मध्ये एकूण ग्राहकसंख्या १०,४१.५ लाखांवर पोहोचली, म्हणजेच एकूण बाजारपेठेत २२.६% वाढ झाली.

२०१६ च्या काळात अनेक लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत होत्या. मात्र, गेल्या दशकात झालेल्या 'मार्केट कॉन्सोलिडेशन'मुळे लहान कंपन्या (Others) पूर्णपणे बंद झाल्या असून, आता ही बाजारपेठ मुख्यत्वे जिओसह चार प्रमुख ऑपरेटरभोवतीच केंद्रित झाली आहे.

गेल्या १० वर्षांतील ट्रायची ही आकडेवारी स्पष्ट करते की, किफायतशीर डेटा आणि डिजिटल सेवांमुळे महाराष्ट्रात जिओचा विस्तार अत्यंत वेगाने आणि व्यापक प्रमाणात झाला आहे.

Comments

No comments yet.