परदेशात लग्नसोहळे आणि विनाकारण सोने खरेदी टाळा... पंतप्रधान मोदी असे का म्हणाले? आणखी संकट येणार?

Share:
Main Image
Last updated: 02-Sep-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २ सप्टेंबर - "आज संपूर्ण जग युद्धाच्या छायेत असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कोरोनानंतर जगात कुठेही स्थिरता नसताना भारत वेगाने प्रगती करत आहे. देशातील निराशेच्या वातावरणाला भेदून भारतीय अर्थव्यवस्थेने ७.८ टक्के इतका भक्कम विकासदर नोंदवला आहे," असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. हीच प्रगतीची गती कायम राखायची असेल तर प्रत्येक भारतीयाने 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वदेशी' या दोन धोरणांचा आग्रहाने अवलंब केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement

'झुठ की गुंज' पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर
पंतप्रधान पुढे म्हणाले, "भारतातील काही निराश वृत्तीचे लोक 'झुठ की गुंज'च्या माध्यमातून चारी दिशांना अपप्रचार करत आहेत. मात्र, देशाच्या भक्कम आर्थिक कामगिरीने या अपप्रचाराला उत्तर दिले आहे."

पंतप्रधान मोदींचा नवा 'कानमंत्र':

परदेशात फिरणे टाळा: विनाकारण परदेशात पर्यटन करण्याऐवजी देशांतर्गत पर्यटनाला चालना द्या.
'डेस्टिनेशन वेडिंग' परदेशात नको: श्रीमंत व संभ्रांत नागरिकांनी परदेशात लग्नसोहळे आयोजित करणे टाळावे.
सोन्याची मर्यादित खरेदी: अत्यंत गरज असेल तरच सोन्याची खरेदी करा, ज्यामुळे परकीय चलनाची बचत होईल.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.