नाशिककरांसाठी खूशखबर... शहराला मिळाली आणखी एक 'अमृत भारत एक्सप्रेस'...

Share:
Main Image
Last updated: 16-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १६ ऑगस्ट - भारतीय रेल्वे बोर्डाने देशभरातील प्रवाशांसाठी ७ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. यामध्ये नाशिककरांसाठी एक खूशखबर असून, उत्तर प्रदेशातील सुबेदारगंज ते मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) दरम्यान धावणाऱ्या नवीन अमृत भारत एक्सप्रेसला नाशिकरोड स्थानकावर अधिकृत थांबा देण्यात आला आहे.  

सुबेदारगंज - लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) अमृत भारत एक्सप्रेस  

गाडी क्रमांक: १४१२१ / १४१२२ (साप्ताहिक)  

प्रमुख मार्ग व थांबे: सुबेदारगंज, फत्तेपूर, गोविंदपुरी, बांदा, चित्रकुटधाम, सतना, कटनी, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिकरोड, कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई).  

उत्तर प्रदेश आणि मुंबई प्रवाशांसाठी सोयीचे:

ही गाडी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणार आहे. नाशिकरोड स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे नाशिककरांना उत्तर भारताकडे जाण्यासाठी आणि मुंबईला येण्या-जाण्यासाठी आणखी एक परवडणारा आणि आधुनिक पर्याय उपलब्ध झाला आहे.

मंजूर झालेल्या इतर प्रमुख अमृत भारत गाड्या:

Advertisement

१. प्रयागराज - लोकमान्य टिळक टर्मिनस (२०४३६/२०४३५)

२. प्रयागराज - उधना (२०४३७/२०४३८)

३. गोरखपूर - वांद्रे टर्मिनस (१५०८५/१५०८६)

४. गोरखपूर - दिल्ली (१५०९५/१५०९६)

५. धनबाद - कोइम्बतूर (२२३६३/२२३६४)

६. चार्लापल्ली - गोरखपूर (२२०७५/२२०७६)  

दरम्यान, या नवीन गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक आणि धावण्याची तारीख लवकरच रेल्वे प्रशासनाकडून जाहीर केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.