मुष्टियुद्धात १०० वर्षांचा विक्रम मोडीत... भारतीय लष्कराच्या इतक्या सैनिकांनी राष्ट्रकुलमध्ये मिळवले पदक...

Share:
Main Image
Last updated: 15-Aug-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट - स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल खेळ २०२६ मध्ये ८ सुवर्ण पदकांसह एकूण १६ पदके जिंकणाऱ्या भारतीय लष्कराच्या तुकडीशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधून त्यांचे मनापासून कौतुक केले. कर्तव्य भवन, नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमाला 'चीफ ऑफ द आर्मी स्टाफ' जनरल धीरज सेठ यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेत भारताने जिंकलेल्या एकूण ३९ पदकांपैकी तब्बल १८ पदके (लष्कर-१६ आणि नौदल-२) भारतीय संरक्षण दलाच्या जवानांनी पटकावली आहेत.

सैनिक आणि विजेते' यांचे परिपूर्ण मिश्रण: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचा "असामान्य" असा उल्लेख करत, हे खेळाडू सैनिक आणि विजेते यांचे एक परिपूर्ण मिश्रण असून देशातील युवा वर्गासाठी प्रेरणेचा मोठा स्रोत आहेत असे सांगितले.

वाढती 'नारी शक्ती': मुष्टियुद्धात भारताला मिळालेल्या ६ सुवर्ण पदकांपैकी ४ सुवर्ण पदके महिला मुष्टिपटूंनी पटकावली आहेत. यामुळे देशातील मुलींना खेळ आणि संरक्षण दलात सामील होण्याची नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

१०० वर्षांचा विक्रम मोडीत: मुष्टियुद्धात भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करत १०० वर्षे जुना इंग्लंडचा विक्रम मोडला. भारताने मुष्टियुद्धात एकूण ७ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके पटकावली, जी राष्ट्रकुल खेळाच्या इतिहासातील एकाच आवृत्तीतील सर्वोच्च कामगिरी आहे.

Advertisement

महत्त्वाचे ऐतिहासिक विक्रम:

हर्ष सिंह: ६० किलो वजनी गटात ज्युडोमध्ये भारतासाठी पहिले राष्ट्रकुल सुवर्ण पदक.

सर्वेश कुशारे: उंच उडीमध्ये भारताचे पहिले ऐतिहासिक रौप्य पदक.

गुलवीर सिंह: एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत २ ॲथलेटिक्स पदके (१०,००० मी. मध्ये रौप्य आणि ५,००० मी. मध्ये कांस्य) जिंकणारा पहिला भारतीय.

सोमन राणा व शुभम जुयाल: दिव्यांगांसाठीच्या गोळाफेकीत (F-57) भारतासाठी अनुक्रमे पहिले सुवर्ण आणि रौप्य पदक.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.