नाशिक जिल्ह्यातील इतक्या लाख मतदारांचे 'स्व-गणना पत्रक' प्रलंबित... अवघ्या ६ दिवसात कसे होणार?

Share:
Main Image
Last updated: 12-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १२ ऑगस्ट - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ज्या मतदारांनी अद्याप 'स्व-गणना पत्रक' भरलेले नाही, त्यांनी ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत भरून जमा करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केले. मतदार यादीतील नोंदींची अचूकता आणि पारदर्शकता जपण्यासाठी हे पत्रक अत्यंत महत्त्वाचे आहे.

जिल्ह्यात सध्या ७ लाख ७२ हजार ९७९ मतदारांनी हे पत्रक संबंधित बीएलओ (BLO) यांच्याकडे जमा केलेले नाही. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी तसेच मयत, स्थलांतरित व दुबार नोंद असलेली नावे वगळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या सूचना व आवाहन:

ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा: मतदार उपलब्ध ऑनलाइन सुविधेचा वापर करून किंवा बीएलओकडून प्राप्त झालेले कागदी पत्रक भरून जमा करू शकतात.

Advertisement

अंतिम मुदत: स्व-गणना पत्रक भरून बीएलओकडे जमा करण्याची आणि त्याचे डिजिटायझेशन करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट २०२६ आहे.

बीएलओची मदत: ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचण आल्यास अथवा अर्ज वितरणाबाबत समस्या असल्यास तात्काळ संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (BLO) संपर्क साधावा.

अंतिम मुदतीची वाट न पाहता सर्व मतदारांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.