नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सुरू होणार... मंत्री भुसे यांच्या बैठकीत निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 11-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ११ ऑगस्ट -  विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यात उत्तम संस्कार, देशभक्ती, स्वसंरक्षणाची भावना आणि सामाजिक बांधिलकी रुजविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे), आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व मार्गदर्शक सूचना:

विद्यार्थिनींचे स्वसंरक्षण व देशभक्ती: शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे विशेष प्रशिक्षण आयोजित करावे. तसेच देशभक्तीपर गीते आणि कवाईत (पीटी) यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लावावी.

पायाभूत सुविधा व दर्जा: प्रत्येक शाळेत स्वच्छ-शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि सुसज्ज इमारतीची सोय असावी. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे गणवेश मिळणार नाहीत याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी.

‘एक पेड माँ के नाम’ व व्यसनमुक्ती: येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वांतत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रत्येक विद्यार्थ्याने 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गत वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करावे. तसेच शाळांमध्ये 'नशामुक्त भारत अभियान' प्रभावीपणे राबवून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करावी.

Advertisement

स्नेहसंमेलन व क्रीडा उपक्रम: विद्यार्थ्यांमधील कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक शाळेत पुन्हा स्नेहसंमेलन (गॅदरिंग) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

केंद्रप्रमुखांची पदोन्नती: प्रलंबित असलेला केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला असून लवकरच त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुणवत्तावाढ आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या

जिल्ह्यातील सर्व शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावून नाशिक जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवावे. लोकप्रतिनिधी व शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, असे निर्देश देण्यात आले.

यावेळी उपस्थित आमदारांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बसची सोय, नवीन वर्ग खोल्या, क्रीडांगण व शाळांना कंपाऊंड भिंत उभारण्याबाबतच्या मागण्या मांडल्या. बैठकीच्या शेवटी मंत्री भुसे यांनी त्र्यंबकेश्वर येथील हिवाळी शाळेचे शिक्षक केशव गावित यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.