नात्यांची वीण घट्ट करणारी 'माजी एबीबी' परिवाराची स्नेहमिलन भेट... रंगल्या आठवणी अन् मैत्रीचा अनोखा सोहळा...

Share:
Main Image
Last updated: 09-Aug-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ९ ऑगस्ट - धावपळीच्या या युगात जुन्या सहकाऱ्यांशी संवाद साधणे, एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करणे आणि भूतकाळातील सोनेरी आठवणींना उजाळा देणे तसे दुर्मिळच होत चालले आहे. मात्र, हीच गरज ओळखून 'असीया-एबीबी इंडिया लि.' (ASEA-ABB India Ltd.) च्या माजी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह एकत्र येत नाशिकमधील 'हॉटेल व्हेज अरोमा' येथे एका अत्यंत भावूक व उत्साहवर्धक स्नेहमिलन सोहळ्याचे (Family Get-Together) आयोजन केले. २२ हून अधिक दांपत्यांच्या (Couples) उत्साही सहभागाने हा सोहळा अत्यंत आठवणीत राहणारा ठरला.

आठवणींचा पट अन् सुरांचे तरंग
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक टी. कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर सुनील रत्नापारखी यांनी या स्नेहमिलनामागची संकल्पना व उद्देश विशद केला. गिरीश बाग यांनी अत्यंत कल्पकतेने व प्रभावीपणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत उपस्थितांना खिळवून ठेवले.

अनुभवांची देवाणघेवाण: परिचयाच्या सत्रात प्रत्येकाने आपल्या नोकरीच्या काळातील गमतीजमती, कामाचे अनुभव आणि शिकायला मिळालेले महत्त्वाचे धडे उपस्थितांसमोर मांडले.

संगीतमय माहौल: नितीन सहस्रबुद्धे यांनी आपल्या मधुर आवाजात सादर केलेल्या गाण्यांनी या सोहळ्यात विशेष रंग भरला.

Advertisement

परफेक्ट नियोजन: आयोजक टीमच्या सुरेख नियोजनामुळे आणि रुचकर भोजनामुळे सर्वच माजी कर्मचाऱ्यांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला.

"पहिले ABB, मग BB!" — कामाप्रती निष्ठा अन् हलकीफुलकी टोलेबाजी
२०२३ मध्ये गणेश कोठावदे व दयानंद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने एबीबी नाशिक येथे आयोजित सोहळ्याच्या प्रेरणेतून या बैठकीची वीण अधिक घट्ट झाली आहे. या संस्थेत प्रत्येक सदस्याने तब्बल २ ते ३ दशकांचा प्रदीर्घ कार्यकाळ व्यतीत केला आहे. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांच्या सहचारिणींची (Partness) साथ तितकीच मोलाची होती.
कार्यक्रमदरम्यान हलक्याफुलक्या वातावरणात "पहिले ABB, नंतर BB (पत्नी)" असा मजेशीर उल्लेख करण्यात आला, ज्यातून कर्मचाऱ्यांचे संस्थेवरील प्रेम आणि कौटुंबिक विश्वासाचे सुंदर समीकरण स्पष्टपणे दिसून आले.

दरमहा 'मिसळ पाव पार्टी' अन् अनोखा बंध
कोर कमिटीच्या वतीने दरमहा सर्व सदस्यांचा वाढदिवस एका खास 'मिसळ पाव पार्टी'मध्ये साजरा केला जातो. आज पुन्हा २४ हून अधिक सदस्य या प्रसिद्ध मिसळ पार्टीसाठी एकत्र आले होते. विशेष म्हणजे सुनील रत्नापारखी हे प्रत्येक भेटीचा गोड सांश स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात लिहून काढतात, ज्यामुळे या आठवणींचा दस्तावेज तयार होत आहे.

२०२७ मध्ये सुवर्ण महोत्सव; 'कर्मभूमी'ला पुन्हा भेट देण्याची उत्सुकता!
एबीबीच्या नाशिक युनिटला २०२७ मध्ये ५० वर्षे (सुवर्ण महोत्सव) पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने सर्व माजी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या 'कर्मभूमी'ला भेट देण्याची, जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याची आणि हा अनोखा ऋणानुबंध साजरा करण्याची पर्वणी मिळणार आहे.

एबीबी ही केवळ एक कंपनी नसून ती माणसांना जोडणारी, विश्वास जपणारी आणि कौटुंबिक नाते निर्माण करणारी एक संस्कृती आहे, हेच या स्नेहमिलनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Advertisement

Comments

No comments yet.