प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी एक झाड लावावे.... मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन

Share:
Main Image
Last updated: 07-Aug-2026

येवला, (प्रतिनिधी) ७ ऑगस्ट - पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येक नागरिकाने झाडांवर प्रेम करावे. विशेषतः प्रत्येक विद्यार्थ्याने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर भावी पिढीसाठी हरित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

इको फ्रेंडली लाइफ संस्थेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

यावेळी इको फ्रेंडली लाइफ संस्थेचे संस्थापक अशोक जगझाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत पवार, विश्वासराव आहेर, नवनाथ काळे, अरुण आहेर, संजय पगार, विठ्ठलराव कांगणे, राजेंद्र रोकडे, सचिन कळमकर, चंद्रकांत वाघ, म्हसु भवर, बाळासाहेब पुंड, साहेबराव आहेर, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर तसेच उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन आणि गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या वर्षभरात येवला तालुक्यातील रेंडाळे आणि भारम परिसरात २० हजार, तर संपूर्ण तालुक्यात ७० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीइतकेच त्यांचे संगोपन महत्त्वाचे असून, महिला बचत गटांच्या माध्यमातून या झाडांची प्रभावी जोपासना केली जात आहे. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना दरवर्षी किमान एक झाड लावण्याचे आणि त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. तसेच, "आज लावलेले झाड हे उद्याच्या पिढीला मिळणारे सर्वात मोठे दान आहे असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

Comments

No comments yet.