विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता... या जिल्ह्यांना अलर्ट...

Share:
Main Image
Last updated: 02-Aug-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २ ऑगस्ट - मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. येत्या ५ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट भागात १ ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तेथे 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.

पाच दिवसांचा जिल्हानिहाय अंदाज व अलर्ट:

१ ऑगस्ट २०२६: पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांत अतिमुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'. तसेच नंदुरबार, नाशिक (घाट परिसर), ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट'.

२ ऑगस्ट २०२६: रायगड, रत्नागिरी, पुणे (घाट), सातारा (घाट), कोल्हापूर तसेच विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

Advertisement

३ ऑगस्ट २०२६: रत्नागिरी, सातारा (घाट परिसर), बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' कायम.

४ ऑगस्ट २०२६: विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज.

५ ऑगस्ट २०२६: बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी.

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

पावसाचा जोर आणि विजांचा कडकडाट लक्षात घेता राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विजा चमकत असताना नागरिकांनी मोकळ्या जागेत न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.