या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा...

Share:
Main Image
Last updated: 28-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २८ जुलै - मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने विविध जिल्ह्यांना 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि अलर्ट:

२८ जुलै:

यलो अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि पुणे-कोल्हापूरचा घाट परिसर.

२९ जुलै:

ऑरेंज अलर्ट: गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

Advertisement

यलो अलर्ट (वादळी पावसाची शक्यता): नाशिक (मैदानी व घाट क्षेत्र), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा आणि पुणे, सातारा व कोल्हापूरचा घाट परिसर.

३० जुलै:

यलो अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि पुणे, सातारा व कोल्हापूरचा घाट परिसर.

नागरिक व शेतकऱ्यांसाठी सुरक्षेच्या सूचना:

विजांच्या कडकडाटावेळी काळजी घ्या: पावसादरम्यान आणि विजा चमकत असताना खुल्या जागेत किंवा झाडांखाली उभे राहणे पूर्णपणे टाळावे.

सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या: वीज पडण्याचा धोका असल्याने नागरिकांनी पक्या घरात किंवा सुरक्षित इमारतींमध्ये आश्रय घ्यावा.

प्रशासकीय सूचनांचे पालन करा: शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

Advertisement

Comments

No comments yet.