दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा... सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी उचलले... त्यानंतर दिवसभर हे सगळं घडलं...

Share:
Main Image
Last updated: 18-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १८ जुलै - वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट २०२६' (NEET 2026) मधील पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर गेल्या २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षण कार्यकर्ते व संशोधक सोनम वांगचुक यांना आज (१८ जुलै) सकाळी दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना थेट सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळावर प्रचंड गोंधळ उडाला असून पोलिसांकडून आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, 'काॅक्रोच जनता पार्टी'चे प्रमुख अभिजित दीपके यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डॉक्टर असल्याचे सांगत पोलीस पडद्याच्या आत शिरले!
आज सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे ही मोहीम राबवली. साध्या वेशातील काही पोलीस कर्मचारी सुरुवातीला 'आम्ही डॉक्टर आहोत' असे सांगून वांगचुक यांच्या तंबूत शिरले. त्यानंतर अचानक काही पोलिसांनी पडद्याच्या आत प्रवेश करत सोनम वांगचुक यांना उचलून बाहेर आणले. त्यांना बाहेर आणताच पोलिसांनी सोबत आणलेल्या कपड्याने वांगचुक यांना झाकण्याचा प्रयत्न केला आणि गाडीत घालून थेट सफदरजंग रुग्णालयात नेले. दिल्ली हायकोर्टाने वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती, त्याच न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते.

अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक अन् अटक
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी नेल्यानंतर आंदोलनाची सूत्रे हाती घेत अभिजित दीपके यांनी स्वतः उपोषणाला बसण्याची घोषणा केली. यावेळी आंदोलनस्थळी घोषणाबाजी सुरू असतानाच दीपके यांनी गंभीर आरोप केला की, "आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये देऊन काही गुंड पाठवण्यात आले आहेत." या आरोपांनंतर काही वेळातच एका युवतीने दीपके यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर पोलिसांनी तत्परतेने त्या तरुणीला आणि पाठोपाठ अभिजित दीपके यांनाही ताब्यात घेतले.

देशभरातून पाठिंबा; २० जुलैला उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार
२८ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातून आणि विविध राजकीय पक्षांकडून मोठा पाठींबा मिळत होता. अरविंद केजरीवाल, प्रकाश आंबेडकर, अखिलेश यादव यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी जंतर-मंतरवर जाऊन वांगचुक यांची भेट घेतली होती.

Advertisement

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सोनम वांगचुक यांच्याशी फोनवरून चर्चा करून पाठींबा दिला होता. आता वांगचुक यांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे हे २० जुलै रोजी विशेष दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते या आंदोलनात थेट सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

?s=20

आंदोलनाची पार्श्वभूमी काय?
'नीट २०२६' परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून देशभरात लाखो विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या मानसिक त्रासामुळे देशात जवळपास २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. याविरोधात 'काँक्रोच जनता पार्टी'ने देशात आंदोलनाचे आवाहन केले होते, ज्याचे नेतृत्व सोनम वांगचुक करत होते. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर धडक मोर्चा काढण्याची तयारी सुरू असतानाच केंद्र सरकारने पोलिसांच्या माध्यमातून हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.