तरुणांना सुवर्णसंधी... ड्रोन बनवा आणि थेट स्टार्ट-अप सुरू करा... मिळवा ६५ लाखांची बक्षिसे...

Share:
Main Image
Last updated: 17-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १७ जुलै - भारताला ड्रोन तंत्रज्ञानात स्वावलंबी बनवण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील स्वदेशी कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY), ड्रोन फेडरेशन इंडियाच्या (DFI) सहकार्याने 'स्वयान' उपक्रमांतर्गत 'नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन अ‍ॅप्लिकेशन अँड रिसर्च'च्या दुसऱ्या आवृत्तीची (NIDAR 2.0, 2026-27) अधिकृत घोषणा केली आहे. नवी दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स निकेतन येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्या हस्ते 'निडर २.०' च्या नियमावलीचे (Rulebook) आणि भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश कुमार सिन्हा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

परदेशी चिपवरील अवलंबित्व संपणार: 'व्हेगा' प्रोसेसरचा वापर

सध्या ड्रोन निर्मितीसाठी परदेशी चिप डिझाइन्स आणि त्यांच्या महागड्या परवाना (लायसन्सिंग) शुल्कावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. हे अवलंबित्व पूर्णपणे संपवण्यासाठी भारताने 'डिजिटल इंडिया आरआयएससी-व्ही' (DIR-V) कार्यक्रमांतर्गत 'व्हेगा' (VEGA) हा स्वदेशी प्रोसेसर विकसित केला आहे.

"निडर २.० विद्यार्थ्यांना केवळ ड्रोन उडवायला शिकवत नाही, तर ड्रोनचा 'मेंदू' विकसित करण्याचे कौशल्य शिकवते. जेव्हा हा 'मेंदू' भारतात विकसित करण्यात आलेल्या 'व्हेगा' प्रोसेसरवर कार्यरत असेल, तेव्हा आपण केवळ अभियंते घडवत नसून स्वावलंबी भारतीय ड्रोन उद्योगाचा भक्कम पाया रचत असू."

- एस. कृष्णन, सचिव (MeitY)

कसे असेल 'निडर २.०' चे आव्हान?

या स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यात आली असून, ती दोन प्रमुख विभागांमध्ये राबवली जाईल:..

Advertisement

विभाग आव्हानाचे स्वरूप

विभाग १: ड्रोन नवोन्मेषविद्यार्थ्यांना असे 'स्वायत्त स्वार्म ड्रोन' (Autonomous Swarm Drones) तयार करावे लागतील, जे कोणत्याही बाह्य नेटवर्कशिवाय, आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या लोकांचा शोध घेऊन तिथे औषधोपचार साहित्य पोहोचवू शकतील.

विभाग २: घटक विकासविद्यार्थ्यांना भारतीय 'व्हेगा' प्रोसेसरचा वापर करून स्वदेशी फ्लाईट कंट्रोलर आणि ऑटोपायलट यंत्रणेची रचना करावी लागेल.

सर्वोत्तम १०० संघांना मोफत 'व्हेगा' प्रोसेसर

तांत्रिक मूल्यमापन फेरीत निवडल्या जाणाऱ्या सर्वोत्तम १०० संघांना पुढील विकास, चाचणी आणि ड्रोन एकत्रीकरणासाठी प्रत्येकी दोन 'व्हेगा' प्रोसेसर संच मोफत दिले जाणार आहेत.

६५ लाखांची बक्षिसे आणि थेट उद्योजक बनण्याची संधी

विद्यार्थ्यांच्या संशोधनाला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी या वर्षी बक्षिसांची रक्कम वाढवून ६५ लाख रुपयांपेक्षा जास्त करण्यात आली आहे. याशिवाय, विजेत्या संघांना केवळ बक्षिसेच मिळणार नाहीत, तर त्यांच्या प्रोटोटाइपचे (प्रारूप) व्यावसायिक उत्पादनात रूपांतर करण्यासाठी उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचे प्रशिक्षण, नवउद्योजकता संवर्धनासाठी (Startup) सहाय्य आणि क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा क्रेडिट्स देखील मोफत दिले जातील.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.