पुणे, (प्रतिनिधी) १४ जुलै - पुणे महानगरपालिका (PMC) क्षेत्रात, विशेषतः नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील सोसायट्यांमध्ये पाणीटंचाई ही एक गंभीर समस्या बनली आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. मात्र, जर तुमच्या बिल्डरने बांधकाम मंजुरी घेताना पालिकेकडे 'शपथपत्र' (Undertaking) दिले असेल, तर टँकरच्या पाण्याचा खर्च बिल्डरनेच करणे बंधनकारक आहे. हा खर्च बिल्डरकडून कसा वसूल करावा, याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे यांनी नागरिकांना मोफत मार्गदर्शनाचा हात दिला आहे.
...तर टँकरचा खर्च बिल्डरलाच करावा लागेल!
नवीन नियमांनुसार, अनेक बिल्डरनी महापालिकेकडे बांधकाम मंजुरी घेताना "जोपर्यंत महापालिका नियमित पाणीपुरवठा करत नाही, तोपर्यंत सदनिकाधारकांना स्वतःच्या खर्चाने पाणी पुरवू," असे शपथपत्र लिहून दिलेले आहे. असे असतानाही अनेक बिल्डर पाण्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात आणि सोसायट्यांना टँकरचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो.
तुमच्या बिल्डरने शपथपत्र दिले आहे का? असे तपासा:
महानगरपालिकेने अशा सर्व बिल्डर्सची अधिकृत यादी जाहीर केली आहे. नागरिक खालील लिंकवर जाऊन आपल्या प्रकल्पाचे नाव तपासू शकतात:
PMC Approved Projects List
https://www.pmc.gov.in/en/b/list-of-approved-construction-projects-with-undertaking-for-water-supply-in-newly-merged-villages
जर तुमच्या प्रकल्पाचे नाव या यादीत असेल, तर तुम्ही महापालिकेकडे तक्रार करून किंवा ग्राहक पंचायतीच्या मदतीने बिल्डरकडून टँकरचे पैसे वसूल करू शकता.
मोफत मार्गदर्शनासाठी ग्राहक पंचायतीशी संपर्क साधा
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे नागरिकांना या कायदेशीर प्रक्रियेसाठी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी ६:०० ते ७:३० या वेळेत मोफत मार्गदर्शन केले जाते.
कार्यालय: ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
वेबसाईट: www.abgpindia.com
संपर्क अधिकारी व मोबाईल क्रमांक:
विजय सागर: 9422502315
विलास लेले: 9823132172
विजया वाघ: 9075132920
रवींद्र वाटवे: 9422383785
राजश्री दीक्षित: 9422318909
सुनील नाईक: 9890330246
प्रकाश राजगुरू: 9423837699
रवींद्र सिन्हा (बाणेर): 7774001188
अरुण नायर (विश्रांतवाडी): 9890652675
पुष्कर कुलकर्णी: 97670 50711