एका तासात लावली तब्बल ३.६१ लाख झाडे... गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड... कुणी आणि कसा केला?

Share:
Main Image
Last updated: 13-Jul-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १३ जुलै - केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात पर्यावरण संवर्धनाचा एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व टप्पा गाठला गेला आहे. 'मियावाकी' पद्धतीचा वापर करून अवघ्या एका तासात तब्बल ३ लाख ६१ हजारांपेक्षा जास्त रोपट्यांची यशस्वी लागवड करत एक नवा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' रचण्यात आला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद महानगरपालिका, मोहिमेत सहभागी झालेले २५ हजारांहून अधिक स्वयंसेवक आणि गांधीनगर मतदारसंघातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

'एक पेड माँ के नाम' मोहिमेला मोठे यश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज पर्यावरण संवर्धनाला एका व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, असे अमित शाह यांनी यावेळी नमूद केले. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना निसर्ग रक्षणाच्या उपक्रमाशी जोडले असून, गांधीनगर लोकसभा मतदारसंघाने या चळवळीत एक नवी ऊर्जा निर्माण केल्याचे ते म्हणाले.

Advertisement

लोकसहभाग आणि सूक्ष्म नियोजनाचे उत्तम उदाहरण

मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली लागवड हे लोकसहभाग, सूक्ष्म नियोजन आणि पर्यावरण संवर्धनाप्रती असलेल्या सामाजिक कटिबद्धतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी कौतुक केले. या मोहिमेत अहमदाबाद महानगरपालिकेसह विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि २५ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.