पवार कुटुंबात पुन्हा सनाई-चौघडे... पार्थ पवार यांचा पुण्यात जंगी साखरपुडा... कोण होणार सुनेत्रा पवारांची सून?

Share:
Main Image
Last updated: 12-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) १२ जुलै - राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि आनंदाची कौटुंबिक बातमी समोर आली आहे. दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव तसेच राज्यसभेचे खासदार पार्थ पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. पार्थ पवार यांचा येत्या २९ जुलै २०२६ रोजी व्यावसायिक व मॉडेल कायनात धार (Kaynaat Dhar) हिच्यासोबत साखरपुडा सोहळा (Engagement Ceremony) पार पडणार आहे. पुण्यातील एका खासगी फार्म हाऊसवर अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भातील माहिती समोर येताच, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शेअर करत पार्थ पवार यांना त्यांच्या आगामी सुखी संसारासाठी आणि नव्या इनिंगसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित पवारांची भावूक पोस्ट; सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल

आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून निमंत्रण पत्रिका शेअर करत लिहिले की, "प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवी इनिंग सुरु करणारे माझे प्रिय बंधू खा. पार्थ आणि कायनात या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा! तुमचा पुढील प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा होवो आणि तुमच्या दोघांचं प्रेमाचं हे नातं उत्तरोत्तर बहरत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!" रोहित पवारांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोण आहेत पवार कुटुंबाच्या होणाऱ्या सून कायनात धार?

Advertisement

पवार कुटुंबाची सून होणाऱ्या कायनात धार या मूळच्या काश्मीरच्या रहिवासी आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण दिल्लीत झाले असून त्या एक यशस्वी मॉडेल आणि व्यावसायिक (Businesswoman) आहेत. सध्या त्या दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही शहरांमध्ये वास्तव्यास असतात. कायनात यांचे पवार कुटुंबाशी अत्यंत सलोख्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्यात कायनात धार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत एकत्रित हजेरी लावली होती. तेव्हापासूनच या नात्याची चर्चा सुरू झाली होती. यापूर्वी पार्थ आणि कायनात यांचे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतानाचे आणि पूजा करतानाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यानंतर पवार कुटुंबात अवघ्या काही महिन्यांतच हा दुसरा मोठा शुभप्रसंग येत असल्याने कौटुंबिक स्तरावर आनंदाचे वातावरण आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.