मुंबई-पुणे मार्गावरील ३० रेल्वे गाड्या रद्द... प्रवाशांनो काळजी करू नका... हा आहे मोठा पर्याय...

Share:
Main Image
Last updated: 11-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ११ जुलै - मुंबई–पुणे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तातडीने धावपळ सुरू केली आहे. या मार्गावर दररोज धावणाऱ्या सुमारे ३० रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही परिस्थिती पाहता, उद्यापासून मुंबई–पुणे मार्गावर दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

ई-शिवनेरीसह साध्या बसेसचे 'मेगा नियोजन'

रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. या अंतर्गत:

ई-शिवनेरी (E-Shivneri): या मार्गावरील ई-शिवनेरीच्या ३१२ नियोजित फेऱ्या नियमितपणे सुरू राहतील.

साध्या बसेस (Ordinary Buses): रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी साध्या बसेसच्या २०० जादा फेऱ्या दररोज चालविण्यात येणार आहेत.

Advertisement

प्रवाशांच्या गर्दीनुसार आणखी बसेस सोडणार

वाहतुकीअभावी कोणत्याही प्रवाशाला अडचण येऊ नये, यासाठी एसटी प्रशासन बस स्थानकांवरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. प्रवाशांची प्रत्यक्ष गर्दी लक्षात घेऊन संबंधित आगार (Depots) आणि विभागांना ऐनवेळी आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

"संकटाच्या काळात एसटी जनतेच्या पाठीशी!"

"संकटाच्या प्रत्येक काळात एसटीने जनतेचा विश्वास नेहमीच सार्थ ठरविला आहे. रेल्वे सेवा बाधित झाल्यानंतरही प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि विनाअडचण राहावा, यासाठी एसटी महामंडळ पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. प्रवाशांची सुरक्षितता, सोय आणि वेळेवर सेवा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, गरजेनुसार आणखी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल."

– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.