पुणे जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांवर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी... काय आहे कलम १६३...

Share:
Main Image
Last updated: 09-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) ९ जुलै - पावसाळ्यात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर आणि संभाव्य अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वाढती गर्दी, संभाव्य अपघात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ (पूर्वीचे कलम १४४) लागू करण्यात आले आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

'या' प्रमुख पर्यटनस्थळांवर राहणार बंदी

प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील आणि इतर अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने खालील ठिकाणांचा समावेश आहे:

मौजे लोणावळा परिसरातील भाजे धबधबा

ऐतिहासिक लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला आणि तुंग किल्ला

निसर्गरम्य टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट आणि शिवलिंग पॉईंट

Advertisement

धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेली एकविरा देवी कार्ला लेणी परिसर

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला पवना धरण परिसर

...म्हणून प्रशासनाने उचलले कडक पाऊल

पावसाळ्यात धबधबे आणि धरणांच्या परिसरात पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी आणि त्यामुळे होणारे अपघात वाढले आहेत. पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, खोल पाण्यात उतरणे, वाहतूक कोंडी करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि संभाव्य जीवितहानी टाळणे यासाठी प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई!

प्रशासनाने पर्यटकांना या आदेशातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक कडे, धबधबे आणि पाणीसाठ्यांच्या परिसरात स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हुल्लडबाजांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.