मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये कियाचा धमाका... सेल्टोसचे २ नवीन प्रीमियम मॉडेल लाँच... असे आहेत फिचर्स आणि किंमत...

Share:
Main Image
Last updated: 02-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) २ जुलै - देशातील आघाडीची मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनी 'किया इंडिया' (Kia India) ने आपल्या अत्यंत यशस्वी आणि लोकप्रिय ऑल-न्यू सेल्टोस (Seltos) श्रेणीचा विस्तार केला आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत सेल्टोसचे दोन नवीन प्रगत आणि हाय-एंड व्हेरिएंट्स 'जीटीएक्स(ओ)' [GTX(O)] आणि 'एक्स-लाइन(ओ)' [X-Line(O)] लाँच करण्याची घोषणा केली आहे. या नवीन मॉडेल्सची किंमत २१,५६,९०० रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. नुकतेच 'भारत एनसीएपी' (Bharat NCAP) कडून ५-स्टार सुरक्षा रेटिंग मिळवल्यानंतर, सेल्टोसच्या या नवीन एडिशनमध्ये सुरक्षेचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि प्रीमियम सोयी-सुविधांचा भरणा करण्यात आला आहे.

प्रगत 'ADAS F+' पॅकेज: सुरक्षेचे २८ हायटेक फीचर्स

नवीन जीटीएक्स(ओ) आणि एक्स-लाइन(ओ) मध्ये कियाचे सेगमेंटमधील आघाडीचे ADAS F+ (प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) पॅकेज देण्यात आले आहे. यामध्ये चालकाच्या सुरक्षिततेसाठी २८ प्रगत फीचर्स समाविष्ट आहेत. यात प्रामुख्याने:

जंक्शन क्रॉसिंग आणि लेन चेंज असिस्ट: समोरून किंवा बाजूने येणाऱ्या वाहनांची धडक टाळण्यासाठी ऑटोमॅटिक ब्रेक आणि स्टिअरिंग असिस्टन्स.

स्मार्ट क्रूझ कंट्रोल: नेव्हिगेशनवर आधारित स्मार्ट क्रूझ कंट्रोल जे झोन आणि वळणांवर (Curves) वाहनाचा वेग आपोआप नियंत्रित करते.

हायवे ड्रायव्हिंग असिस्ट (HDA): महामार्गांवर सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी विशेष तंत्रज्ञान.

कॉकपिट डिझाईन आणि प्रीमियम फीचर्सचा भरणा

अत्याधुनिक सुरक्षेच्या पलीकडे जात या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये ग्राहकांना लक्झरी अनुभव देणारे फीचर्स जोडले गेले आहेत. यामध्ये:

Advertisement

किया कनेक्ट २.०: कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपिट (CCNC) सह ८५ हून अधिक स्मार्ट फीचर्स.

डिजिटल की आणि हेड-अप डिस्प्ले: विंडशील्डवरच आवश्यक माहिती प्रोजेक्ट करणारी यंत्रणा आणि डिजिटल चावी.

स्मार्ट एअर प्युरिफायर: हवेची गुणवत्ता (AQI) दर्शवणाऱ्या प्युरिफायरसह रेन सेन्सिंग वायपर्स.

स्मार्ट डॅशकैम: प्रवासातील प्रत्येक क्षण रेकॉर्ड करण्यासाठी फ्रंट आणि रिअर कॅमेरा (मोबाईल ॲप कनेक्टिव्हिटीसह).

प्रादेशिक भाषांमध्ये 'व्हॉईस-एनेबल्ड' कमांड्स आणि वन-टच ऑटो अप/डाऊन पॉवर विंडोज.

"सुरक्षेमध्ये आयसीई (ICE) वाहनांमध्ये सेल्टोस अव्वल!"

या नव्या सादरीकरणावर बोलताना किया इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे सीनियर व्हाईस-प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले, "ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांनुसार सेल्टोसमध्ये सातत्याने बदल झाले आहेत. ५-स्टार भारत एनसीएपी रेटिंगमुळे सेल्टोस ही आजवरची भारतातील सर्वाधिक सुरक्षित 'आयसीई' (Internal Combustion Engine) वेईकल ठरली आहे. नवीन जीटीएक्स(ओ) आणि एक्स-लाइन(ओ) च्या माध्यमातून आम्ही प्रगत सुरक्षा, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि प्रीमियम सोयी-सुविधा एकाच गाडीत आणल्या आहेत, ज्यामुळे डिझाइन, जागा आणि तंत्रज्ञानात सेल्टोसचे आकर्षण आणखी वाढेल."

दरमहा १०,००० हून अधिक गाड्यांची विक्री!

लाँच झाल्यापासून ऑल-न्यू सेल्टोसने भारतातील सर्वात यशस्वी 'मिड-एसयूव्ही' म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. भारतीय ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर या कारने दरमहा १०,००० हून अधिक वाहनांच्या विक्रीचा सातत्यपूर्ण विक्रम नोंदवला आहे. आता १०.९९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होणाऱ्या संपूर्ण सेल्टोस पोर्टफोलिओमध्ये हे दोन नवीन 'ओ' (O) व्हेरिएंट्स समाविष्ट झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी आणखी प्रबळ आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.