पावसाळी अधिवेशन सुरू असताना बदल्यांचा धडाका... या १४ IPS अधिकाऱ्यांना नवीन नियुक्ती... बघा, संपूर्ण यादी...

Share:
Main Image
Last updated: 24-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २४ जून - राज्य शासनाने गृह विभागा अंतर्गत पोलीस दलात मोठे फेरबदल केले असून, राज्यातील १४ बड्या आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये राज्याचे डॅशिंग पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच, नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची विश्वास नांगरे पाटील कार्यरत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या बदल्यांसह राज्यातील इतर १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

कोणकोणत्या बड्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?

गृह विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत यादीनुसार बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची नवीन पदे खालीलप्रमाणे आहेत:

विश्वास नांगरे पाटील: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ते पोलीस आयुक्त, नागपूर शहर.

रविंद्र सिंघल: पोलीस आयुक्त, नागपूर शहर ते महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB).

दत्तात्रय शिंदे: अपर पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार ते (पदोन्नतीने) पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग (सीआयडी), पुणे.

संजय शिंत्रे: पोलीस उपमहानिरीक्षक, सायबर मुंबई ते अपर पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार.

संजय वर्मा: पोलीस महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) ते पोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ.

अर्चना त्यागी: पोलीस महासंचालक (पोलीस गृहनिर्माण व कल्याण) ते पोलीस महासंचालक, न्यायिक व तांत्रिक.

उप आयुक्त आणि जिल्हा प्रमुखांच्या बदल्यांची यादी:

अभिनाज कुमार: पोलीस अधीक्षक, नांदेड ते पोलीस उप आयुक्त, पुणे शहर.

Advertisement

निलेश रोहेन: पोलीस अधीक्षक, हिंगोली ते पोलीस अधीक्षक, नांदेड.

श्रीमंत लाड: अपर पोलीस अधीक्षक, खामगाव (बुलढाणा) ते पोलीस अधीक्षक, हिंगोली.

प्रांजली सोनावणे: पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), अमरावती ते पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर.

रमेश धुमाळ: पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर ते पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर.

शशिकांत सातव: पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ते पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर.

प्रशांत मोहिते: पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर ते पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई.

रुपाली अंबुरे: पोलीस उप आयुक्त, डायल ११२, नवी मुंबई ते पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ.

पीयूष जगताप: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. १७, चंद्रपूर ते अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा.

नारायण शिरगांवकर: समादेशक, एसआरपीएफ गट क्र. १३, गडचिरोली ते समादेशक, एसआरपीएफ गट क्र. १९, कुरळगाव, अहिल्यानगर.

प्रशासकीय कणा मजबूत करण्यावर भर!

आगामी काळातील कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान लक्षात घेता, गृह विभागाने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विशेषतः नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या धडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती आणि सायबर तसेच सीआयडी विभागातील फेरबदल यामुळे पोलीस प्रशासनाला नवीन गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.