केंद्राचा मोठा निर्णय... महाराष्ट्रात रब्बी कांदा खरेदी आता या दराने... आजपासून नवे दर लागू...

Share:
Main Image
Last updated: 21-Jun-2026

नाशिक/नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २१ जून - महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वर्ष २०२६ च्या रब्बी हंगामातील कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारने १,७३० रुपये प्रति क्विंटल अशी 'किमान हमी खरेदी किंमत' (Minimum Assured Procurement Price - MAPP) निश्चित केली आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत (Ministry of Consumer Affairs, Food & Public Distribution) असलेल्या 'कॉस्टिंग सेल'ने याबाबतचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ही नवीन दराची प्रणाली शनिवार, दि. २० जून २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.

परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे :

किमान हमी भाव: रब्बी कांदा २०२६ च्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान १,७३० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

Advertisement

अंमलबजावणी: ग्राहक व्यवहार विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीने हा निर्णय घेण्यात आला असून, २० जून २०२६ पासून तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी सुरू झाली आहे.

नोडल एजन्सीज: या निर्णयाची प्रत 'नाफेड' (NAFED) आणि 'एनसीसीएफ' (NCCF) च्या व्यवस्थापकीय संचालकांना (MD) पुढील योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरून या एजन्सींमार्फत होणाऱ्या कांदा खरेदीला गती मिळू शकेल.

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या सहाय्यक संचालक (कॉस्ट) शिवानी गोयल यांच्या स्वाक्षरीने हे कार्यालयीन निवेदन (Office Memorandum) जारी करण्यात आले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी सरकारकडून उचललेले हे पाऊल महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.