द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल सुरू

Share:
Main Image
Last updated: 07-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ जानेवारी - ब्‍युटी व पर्सनल केअरप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. द बॉडी शॉप या ब्रिटीश आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रँडने आपल्‍या बहुप्रतिक्षित एण्‍ड ऑफ सीझन सेल (ईओअएसएस)च्‍या लॉंचची घोषणा केली आहे, जेथे श्रेणींवर आकर्षक ऑफर्स आहेत. अविश्वसनीय दरांमध्‍ये पसंतीच्या आवश्‍यक वस्‍तू खरेदी करण्‍यास ग्राहकांना आमंत्रित करणारा ईओएसएस महिनाभर सुरू राहणार आहे. द बॉडी शॉप आपले फुल फ्लॉवर्स फ्रॅग्रॅन्‍स कलेक्‍शन, मेकअपच्या वस्‍तू, जसे सेकंड स्किन, फ्रेश न्‍यूड आणि क्रेयॉन श्रेणींवर जवळपास ५० टक्‍क्‍क्‍यांची मोठी सूट देखील देत आहे.

५० टक्क्यांपर्यंतची सूट निवडक श्रेणींवरही लागू आहे. यामध्ये टी ट्री, एडलविस आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या निवडक सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्किनकेअर श्रेणींचा समावेश आहे. तसेच बनाना, जिंजर आणि शिया यांसारख्या लोकप्रिय हेअरकेअर श्रेणींवरही आकर्षक सवलत उपलब्ध आहे. मोरिंगा, स्ट्रॉबेरी आणि ब्रिटीश रोझ यांसारख्या बॉडीकेअर फेवरेट्सवर ग्राहकांना विशेष ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय, पॅशनफ्रूट, शिया आणि सॅफ्रॉन तसेच क्रॅनबेरी, शुगरप्लम आणि कॅरेमल यांसारख्या हंगामी फेवरेट्सचा समावेश असलेल्या लिमिटेड एडिशन बाथ अँड बॉडी श्रेणींवरही हा सेल लागू आहे.

सर्वोत्तम घटक आणि शाश्वतरित्‍या डिझाइन केलेल्‍या उत्‍पादनांसह द बॉडी शॉपचा एण्‍ड ऑफ सीझन सेल अधिक बचतींसाठी अर्थपूर्ण संधी देतो, तसेच अधिक जागरूक ब्‍युटी चळवळीप्रती योगदान देखील देतो.

Comments

No comments yet.