प्रशासकीय फेरबदल... राज्यात १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या... बघा, संपूर्ण यादी...

Share:
Main Image
Last updated: 17-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ जून - राज्य सरकारने आज प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १२ वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये मुंबई महापालिका, सिडको, एमआयडीसी आणि एमएमआरडीए यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमधील सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण बदल्यांचे आदेश आज (१६ जून) सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आले.

महत्त्वाच्या बदल्या आणि नवीन पदस्थापना अशी

१. विजय सिंघल (आयएएस:आरआर:१९९७), व्हीसीएमडी, सिडको, मुंबई यांची धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई येथे विशेष कार्य अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. 

२. प्राजक्ता वर्मा (आयएएस:आरआर:२००१) यांची बृहन्मुंबई, मुंबई येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. 

३. पी. वेलरासू (आयएएस:आरआर:२००२), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांची महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सचिव (वन) म्हणून बदली करण्यात आली आहे.

४. डॉ. अश्विनी जोशी (आयएएस:आरआर:२००६), बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए, मुंबई म्हणून बदली करण्यात आली आहे. 

५. दीपेंद्र सिंह कुशवाह (IAS:RR:2006) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

Advertisement

६. अश्विन मुदगल (IAS:RR:2007) अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई यांची VCMD, CIDCO, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

७. डॉ. कादंबरी बलकवडे (IAS:RR:2010) आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, NHM, मुंबई यांची विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

८. संजय काटकर (IAS:SCS:2014) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची आयुक्त (कुटुंब कल्याण) आणि संचालक, NHM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

९. झेनिथ चंद्र डोंथुला (आयएएस:आरआर:२०२२) पीओ, आयटीडीपी, किनवट आणि सहायक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून बदली झाली आहे. 

१०. अनय नवंदर (आयएएस:आरआर:२०२२) पीओ, आयटीडीपी, तळोडा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोडा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला म्हणून बदली झाली आहे. 

११. डॉ. बी. सरवणन (आयएएस:आरआर:२०२३) सहायक जिल्हाधिकारी, भोखरदान उपविभाग, जालना यांची पीओ, आयटीडीपी, किनवट आणि सहायक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड म्हणून बदली झाली आहे. 

१२. लघिमा तिवारी (IAS:RR:2023) सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडप्री उपविभाग, चंद्रपूर यांना PO, ITDP, तळोदा आणि सहायक जिल्हाधिकारी, तळोदा उपविभाग, नंदुरबार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.


मुंबई आणि परिसरातील आगामी मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या गतीसाठी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग देण्यासाठी विजय सिंघल यांची झालेली नियुक्ती प्रशासकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे. तसेच अकोला आणि गोंदिया जिल्हा परिषदांना नवे तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) लाभले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.