काश्मीरमध्ये अभियांत्रिकीचा चमत्कार... झोजिला बोगद्याची दोन्ही टोके जोडण्यात ऐतिहासिक यश... (बघा व्हिडीओ)

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १० जून - देशाच्या पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणीच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण नोंदवला गेला. जम्मू-काश्मीर आणि लदाख या दोन केंद्रशासित प्रदेशांना वर्षभर अखंड जोडणाऱ्या 'झोजिला बोगदा' प्रकल्पातील मुख्य बोगद्याची दोन्ही टोके (पूर्व आणि पश्चिम बाजू) एकमेकांना जोडण्याचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारगिल जिल्ह्यातील मिनामार्ग येथे उपस्थित राहून या ऐतिहासिक प्रसंगाची प्रत्यक्ष पाहणी केली.

"झोजिला बोगदा हा केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून, या संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे प्रवेशद्वार ठरेल," असा विश्वास नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर लदाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना हे दूरस्थ पद्धतीने (व्हर्च्युअली) सहभागी झाले होते.

जगातील सर्वात आव्हानात्मक भूप्रदेशात कामगिरी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर बालताल आणि मिनामार्ग दरम्यान उभारण्यात येत असलेला हा १४ किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्ग (टू-लेन) असलेला बोगदा आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल २,९०० ते ३,३१० मीटर इतक्या अद्भूत उंचीवर हा बोगदा बांधला जात आहे. प्रचंड हिमवृष्टी, उणे तापमान आणि गुंतागुंतीची भौगोलिक आव्हाने असूनही कंत्राटदार, अभियंते आणि कामगारांनी प्राणांची बाजी लावून हे यश साध्य केले आहे.

६,८०० कोटींचा खर्च आणि जागतिक दर्जाची सुरक्षा

अंदाजे ६,८०० कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या बोगद्यात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामध्ये खालील अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे:

Advertisement

सुरक्षा यंत्रणा: आधुनिक वायुवीजन (व्हेंटिलेशन) प्रणाली, आग शोधणारी स्वयंचलित यंत्रणा आणि हायटेक सीसीटीव्ही देखरेख.

आत्त्कालीन मार्ग: पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि तातडीच्या प्रवासासाठी मुख्य बोगद्यात अंतर्गत 'क्रॉस-पॅसेज' (आंतर-रस्ते) सुविधा.

हिमस्खलनापासून संरक्षण: बर्फाचे कडे कोसळण्यापासून बचाव करण्यासाठी ८ ठिकाणी 'कट अँड कव्हर' विभाग, स्नो गॅलरीज आणि ४ विशेष पूल.

संरक्षणाच्या दृष्टीनेही मैलाचा दगड

हिवाळ्यात अतिवृष्टी आणि बर्फवृष्टीमुळे झोजिला घाट बंद पडत असल्याने लदाखचा देशाच्या उर्वरित भागाशी संपर्क तुटायचा. लष्कराच्या वाहतुकीलाही यामुळे मोठे अडथळे यायचे. मात्र, आता हा बोगदा जोडला गेल्यामुळे कोणत्याही हवामानात भारतीय सैन्य आणि नागरिक लदाखपर्यंत अखंड प्रवास करू शकतील, ज्यामुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.