वादळग्रस्त शेतकऱ्याच्या घराला पुन्हा मिळाला आधार; मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळांनी दिला मदतीचा हात

Share:
Main Image
Last updated: 09-Jun-2026

येवला, (प्रतिनिधी) ९ जून - येवला तालुक्यातील देवळाणे येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पाऊस व वाऱ्यामुळे बबन जाधव, प्रल्हाद खामकर व उमेश जाधव या शेतकऱ्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार समीर भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शेतकऱ्याची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या घराची तातडीने दुरुस्ती करून देण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत संबंधित शेतकऱ्याच्या घराची आवश्यक दुरुस्ती पूर्ण केली. त्यामुळे वादळी पावसामुळे संकटात सापडलेल्या या शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बबन जाधव यांच्या कुटुंबातील जखमी असलेल्या सदस्यांवर मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून उपचार करण्यात आले.

Advertisement

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत देवळाणे येथे भेट देऊन दुरुस्ती केलेल्या घराची पाहणी केली. यानंतर त्यांनी संबंधित शेतकरी कुटुंबाला दुरुस्त करण्यात आलेल्या बबन जाधव यांना घराचा ताबा सुपूर्द केला. तसेच प्रल्हाद खामकर व उमेश जाधव यांना आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी शेतकरी कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या समाधानामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आलेल्या या कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दत्ता निकम, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, मकरंद सोनवने, बाळासाहेब काळे, देविदास निकम, संजय पगारे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुमित थोरात यांच्यासह शेतकरी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी शेतकरी बबन जाधव, प्रल्हाद खामकर व उमेश जाधव यांच्या कुटुंबीयांनी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ तसेच प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे यांचे मनःपूर्वक आभार मानले. संकटाच्या काळात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या मदतीमुळे मोठा आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सामाजिक उत्तरदायित्व जपत सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने कार्यरत असून नैसर्गिक आपत्तीग्रस्त व गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सदैव तत्पर असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Advertisement

Comments

No comments yet.