त्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला... आनंद महिंद्रांनी मोठी घोषणाच करून टाकली... सर्वत्र जोरदार चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 07-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ जून - प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे त्यांच्या व्यवसाय कौशल्यासोबतच सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी आणि संवेदनशीलतेसाठी ओळखले जातात. अनेकदा ते जगावेगळं कौशल्य असणाऱ्या किंवा गरजू लोकांचे व्हिडिओ शेअर करून त्यांना मदत करत असतात. आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांच्या एका मोठ्या घोषणेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. रस्त्याच्या कडेला जादूचे प्रयोग दाखवून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या एका चिमुकल्या मुलाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला असून, त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा आणि कौशल्याचा खर्च उचलण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये?

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या 'एक्स' (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'साहिल' नावाचा एक चिमुकला मुलगा उत्तराखंडच्या नैनिताल येथील एका रस्त्यावर जादूचे प्रयोग दाखवताना दिसत आहे. राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला हा मुलगा एक वाटी, एक जादूची कांडी, नाणं आणि लहान लाल चेंडू अशा साध्या वस्तूंचा वापर करून अत्यंत आत्मविश्वासाने मोठ्या गर्दीसमोर जादूचे प्रयोग सादर करत आहे. त्याची ही अफाट कला आणि आत्मविश्वास पाहून रस्त्याने येणारे-जाणारे लोक थक्क झाले आहेत. या चिमुकल्याच्या कलेची भुरळ थेट आनंद महिंद्रा यांनाही पडली.

आनंद महिंद्रा यांनी काय म्हटले?

हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी या मुलाला शोधण्यासाठी नेटीझन्सची मदत मागितली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की,

Advertisement

"हा मुलगा प्रचंड हुशार आहे. तो अजूनही नैनितालच्या रस्त्यावर काम करतोय का? मला त्याला केवळ त्याच्या अभ्यासातच नाही, तर त्याच्या जादूतील आवडीलाही प्रोत्साहन द्यायचे आहे. तो जगातील महान जादूगारांपैकी एक का बनू नये? मला कोणीतरी त्याच्याशी आणि त्याच्या पालकांशी संपर्क साधायला मदत करू शकेल का?"

नेटीझन्सकडून कौतुकाचा वर्षाव आणि मुलाचा पत्ता शोधण्यास सुरुवात

आनंद महिंद्रा यांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक युजर्सनी या मुलाला शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एका युझरने लिहिले, "माझे नातेवाईक हल्द्वानीमध्ये राहतात, मी त्यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो." तर दुसऱ्या एका युझरने या मुलाची माहिती देत लिहिले, "हा साहिल असून त्याचे कुटुंब मूळचे राजस्थानचे आहे. सध्या ते उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर परिसरात राहतात."

एका युझरने अतिशय सुंदर प्रतिक्रिया देत म्हटले की, "अशा मुलांमधील कौशल्य सहसा कोणी ओळखू शकत नाही. मात्र, आता आनंद महिंद्रा यांच्यामुळे या मुलाचे नशीब बदलणार आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे." आनंद महिंद्रा यांच्या या सहृदयतेमुळे साहिलच्या आयुष्याला आता एक नवी आणि मोठी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.