नाशिकमध्ये रंगणार 'पुस्तकावर बोलू काही'चा जागर... संपादक भावेश ब्राह्मणकर साधणार संवाद... जून महिन्याचे असे आहेत वक्ते...

Share:
Main Image
Last updated: 25-May-2026

नाशिक (प्रतिनिधी), २३ मे २०२६ - नाशिकची सांस्कृतिक आणि वाङ्मयीन परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी 'गिरणा गौरव प्रतिष्ठान'च्या वतीने जून महिन्यात ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत जून महिन्यातील प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता नाशिकमधील नामवंत लेखक, विचारवंत आणि वक्ते वेगवेगळ्या दर्जेदार पुस्तकांवर आणि साहित्यकृतींवर रसिकांशी संवाद साधणार आहेत. हा संपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या हुतात्मा स्मारक येथे पार पडणार असून, नाशिककर ग्रंथप्रेमींसाठी ही एक उत्तम पर्वणी असणार आहे.

'चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं वाचल्याशिवाय कळत नाही'

"चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं ही वाचल्याशिवाय समजत नाहीत, हाच विचार घेऊन हा कट्टा सुरू करण्यात आला आहे. जून महिन्यामध्ये कविता, कादंबरी, वैचारिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या पुस्तकांचा वेध घेतला जाणार आहे. नाशिकमधील जास्तीत जास्त वाचक, लेखक आणि तरुणांनी या उपक्रमाला उपस्थित राहावे," असे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

संपादक भावेश ब्राह्मणकर यांचाही संवाद

मराठी साप्ताहिक सुपरफास्ट नाशिक मेल आणि वेबपोर्टल सुपरफास्ट नाशिक डॉट कॉमचे संपादक आणि लेखक भावेश ब्राह्मणकर हे सुद्धा संवाद साधणार आहेत. ब्राह्मणकर यांचे अरूणोदय हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान प्राप्त आणि अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील सैन्याच्या कामकाजावर आधारित ही कादंबरी आहे. अतिशय आव्हानात्मक आणि थरारक प्रसंगांना तोंड देणाऱ्या सैनिकांची कथा या कादंबरीत विषद करण्यात आली आहे. यानिमित्ताने या कादंबरीचे अनेक पैलू ब्राह्मणकर हे उलगडणार आहेत.

 जून महिन्यातील व्याख्यानांचे व वक्त्यांचे संपूर्ण वेळापत्रक असे:

 

Comments

No comments yet.