शेती आणि आरोग्याचा संगम... देशात 'सेहत मिशन'चा ऐतिहासिक शुभारंभ... असा होणार तुम्हाला फायदा...

Share:
Main Image
Last updated: 12-May-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १२ मे - "भारताने आता केवळ आजारांवर उपचार करण्यापेक्षा ते टाळण्यावर (प्रतिबंधात्मक उपाय) भर दिला आहे. 'सेहत मिशन'च्या माध्यमातून कृषी आणि आरोग्य संस्था एकत्र आल्या असून, हे अभियान निरोगी भारताच्या निर्मितीत मैलाचा दगड ठरेल," असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी केले. नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी 'सेहत मिशन'चा (SEHAT Mission) शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'होल ऑफ गव्हर्नमेंट' या संकल्पनेतून साकारलेले हे मिशन भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांच्या संयुक्त भागीदारीतून राबवले जाणार आहे.

शेतीपासून थाळीपर्यंत अन् आरोग्यापर्यंत!

हे अभियान प्रामुख्याने 'शेती ते थाळी आणि थाळी ते आरोग्य' या सूत्रावर आधारित आहे. यामध्ये खालील बाबींवर विशेष लक्ष दिले जाणार आहे:

पोषणयुक्त पिके: केवळ अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे नाही, तर जैव-पोषणमूल्ययुक्त (Bio-fortified) पिकांच्या उत्पादनावर भर दिला जाईल.

आजारांवर मात: मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी योग्य आहारपद्धती विकसित केली जाईल.

Advertisement

शेतकरी आरोग्य: कीटकनाशकांचा संपर्क आणि रसायनांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी वैज्ञानिक उपाययोजना केल्या जातील.

आहार हेच औषध - शिवराज सिंह चौहान

यावेळी बोलताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "आज देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण आहे, मात्र आता आपले लक्ष्य 'पोषणयुक्त उत्पादन' हे आहे. जर आपण योग्य पिकांची निवड केली आणि शास्त्रीय आहार पद्धती अवलंबली, तर आहार हेच औषध ठरू शकते. हे अभियान शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी एक वैज्ञानिक साखळी तयार करेल."

हे मिशन 'वन हेल्थ' (One Health) या दृष्टिकोनावर केंद्रित असून, याचा फायदा केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण मानवजातीला होईल, असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला.

?s=20

Comments

No comments yet.