सुट्टीत अष्टविनायक यात्रेचा प्लॅन करताय?  'या' तीन मंदिरांत महिनाभर दर्शन बंद...

Share:
Main Image
Last updated: 10-May-2026

पुणे, (प्रतिनिधी) १० मे - सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर उधाण आले असतानाच, अष्टविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक ही तीन मंदिरे उद्यापासून (१० मे) पुढील महिनाभर भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत.

पुढील महिनाभर मंदिरे बंद
अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत मंदिरांचे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे खालील तीन मंदिरे १० मे ते ९ जून २०२६ या कालावधीत दर्शनासाठी बंद राहतील:
श्री मयुरेश्वर मंदिर, मोरगाव
श्री चिंतामणी मंदिर, थेऊर
श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

Advertisement

पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्ती
राज्य सरकारने अष्टविनायक मंदिरांच्या संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. मंदिरांचे ऐतिहासिक महत्त्व आणि जुन्या वास्तूंचे आयुष्य वाढवण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या थेट मार्गदर्शनाखाली हे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. ऐन सुट्टीच्या काळात ही मंदिरे बंद असल्याने पर्यटन आणि दर्शनाचे नियोजन करणाऱ्या भाविकांची काहीशी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या अष्टविनायक यात्रेचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.