युवकांनो, नामांकित कंपन्यांत कामाचा अनुभव मिळवा... इतके हजार मानधनही मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 11-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) ११ मे - देशातील तरुण पिढीला उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना' (PM Internship Scheme) सुरू केली आहे. या योजनेचा तिसरा टप्पा सध्या सुरू असून, मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे.

टाटा, रिलायन्ससारख्या बड्या कंपन्यांत संधी

या योजनेअंतर्गत देशातील टॉप २००० कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, एचपीसीएल, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, टाटा कॅपिटल आणि टायटन यांसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाईल.

आर्थिक लाभ आणि विमा कवच

प्रतिमाह विद्यावेतन: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ९,००० रुपये स्टायपेंड थेट बँक खात्यात (DBT) जमा केला जाईल.

एकवेळचे अनुदान: इंटर्नशिप सुरू केल्यावर विशेष खर्च म्हणून ६,००० रुपये दोन हप्त्यांत दिले जातील.

Advertisement

विमा संरक्षण: लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे विमा संरक्षण दिले जाईल.

पात्रता आणि अटी

वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे.

शिक्षण: १० वी, १२ वी, आयटीआय (ITI), डिप्लोमा, पदवीधर (BA, B.Com, B.Sc), बी.ई. किंवा बी.टेक उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

अट: उमेदवार सध्या पूर्णवेळ नोकरीमध्ये नसावा.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी करून रिक्त पदांसाठी अर्ज करावा. तसेच ज्या उद्योजकांना आपल्या आस्थापनेत उमेदवार भरती करायचे आहेत, त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Advertisement

Comments

No comments yet.