धुरंधरच्या सक्सेस पार्टीत दीपिका का नव्हती?  अखेर गुपित उलगडलं... दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा होणार आई...

Share:
Main Image
Last updated: 19-Apr-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १९ एप्रिल - बॉलीवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोण आणि 'बाजीराव' रणवीर सिंह यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी आई झालेल्या दीपिकाने आपल्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची अधिकृत घोषणा केली असून, त्यांच्या कुटुंबात लवकरच चौथ्या सदस्याचे आगमन होणार आहे. दीपिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली असून, तिची कन्या 'दुआ' आता मोठी ताई होणार आहे.

अशी दिली 'गुड न्यूज'
दीपिकाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून लेक दुआचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोत दुआच्या हातात 'प्रे प्रेग्नेंसी टेस्ट किट' दिसत असून त्यावर पॉझिटिव्ह रिझल्टच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना दीपिकाने पती रणवीर सिंहला टॅग केले आहे. फोटोमध्ये दुआचा चेहरा पूर्णपणे दिसत नसला तरी, या बातमीने सोशल मीडियावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पोस्टवर अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने तीन हार्ट इमोजी शेअर करत अभिनंदन केले आहे, तर लाखो चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

प्रमोशनला न येण्याचे गुपित उलगडले

गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंहचा 'धुरंधर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशामुळे रणवीर चर्चेत असला तरी, दीपिका कोणत्याही प्रमोशन किंवा कार्यक्रमात दिसत नव्हती. त्यामुळे दीपिका कुठे आहे? असा प्रश्न विचारला जात होता. आज १९ एप्रिल रोजी या 'गुड न्यूज'मुळे ती का गायब होती, याचे उत्तर चाहत्यांना मिळाले आहे.

दीपिकाची ८ तासांच्या शूटिंगची अट

पहिल्या बाळानंतर म्हणजेच दुआच्या जन्मानंतर दीपिकाने कामाच्या बाबतीत काही कडक अटी निर्मात्यांसमोर ठेवल्या होत्या. मातृत्वाची जबाबदारी सांभाळता यावी यासाठी तिने दिवसाला केवळ ८ तास शूटिंग करण्याची अट घातली होती. या मुद्द्यावरून चित्रपट सृष्टीत बराच गदारोळ झाला होता आणि तिला काही मोठे प्रोजेक्ट्स सोडावे लागले होते. मात्र, अनेक कलाकारांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

Advertisement

२०१८ मध्ये झाले लग्न
दीपिका आणि रणवीर १५ नोव्हेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या सहा वर्षांनंतर ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना पहिली मुलगी 'दुआ' झाली. आता लग्नाच्या ८ व्या वर्षी हे दांपत्य आपल्या दुसऱ्या अपत्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. या बातमीमुळे संपूर्ण पादुकोण आणि सिंह कुटुंबात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे.

?igsh=ZmpkczFwZ2VhYTBu

Comments

No comments yet.