अक्षय्य तृतीयेला 'जियो'ची सुवर्ण ऑफर...   मिळणार १ टक्का जास्तीचे सोने...

Share:
Main Image
Last updated: 15-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १५ एप्रिल - अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी जियोफायनान्सने (JioFinance) एक विशेष आनंदाची बातमी आणली आहे. आपल्या ग्राहकांसाठी 'डिजिटल गोल्ड' खरेदीवर अतिरिक्त सोने, दुप्पट रिवॉर्ड पॉइंट्स आणि मेगा ड्रॉमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी कंपनीने जाहीर केली आहे.

काय आहे ही खास ऑफर?
ही मोहीम १९ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवण्यात येणार असून, ग्राहकांना 'जियोफायनान्स अॅप'च्या माध्यमातून याचा लाभ घेता येईल. या ऑफरचे मुख्य आकर्षण खालीलप्रमाणे आहेत:
१% अतिरिक्त सोने: जर तुम्ही ₹२,००० पेक्षा जास्त किमतीचे डिजिटल गोल्ड खरेदी केले, तर तुम्हाला १% अतिरिक्त सोने मिळेल (कमाल ₹१,००० पर्यंत). हे सोने ४ कामकाजाच्या दिवसांत तुमच्या खात्यात जमा होईल.
२४ कॅरेट सोने जिंकण्याची संधी: ₹१०,००० किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणारे ग्राहक 'अक्षय तृतीया मेगा ड्रॉ' साठी पात्र ठरतील. यातील ५ भाग्यवान विजेत्यांना १ ग्रॅम (२४ कॅरेट) डिजिटल गोल्ड मोफत दिले जाईल.
दुप्पट रिवॉर्ड पॉइंट्स: ₹५,००० च्या एकरकमी गुंतवणुकीवर किंवा ₹१,५०० च्या SIP वर ग्राहकांना २x जियोपॉइंट्स मिळतील.

Advertisement

गुंतवणुकीची सुलभता
जियोफायनान्सच्या या प्लॅटफॉर्मवर ग्राहक अगदी ₹१० पासून सोन्यात गुंतवणूक करू शकतात. विशेष म्हणजे, साठवलेले हे डिजिटल सोने गरजेनुसार रोख रक्कम किंवा सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात रिडीम (परत मिळवणे) करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

 या सर्व ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी आपले 'जियोफायनान्स ऍप' अपडेट करणे किंवा नवीन असल्यास डाउनलोड करणे आवश्यक आहे.

Comments

No comments yet.