महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर... या तारखेपासून करा अर्ज...

Share:
Main Image
Last updated: 25-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ मार्च -  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 ही परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर 27 मार्च ते 16 एप्रिल 2026 पर्यंत सुरू असणार आहे. इछुकांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये  दिली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर क्रमांक 1) व सहावी ते आठवी (पेपर क्रमांक 2) साठी शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा आवश्यक असून, सर्व व्यवस्थापनाच्या तसेच अनुदानित/विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील उमेदवारांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. या परीक्षेसंदर्भातील सविस्तर शासन निर्णय, अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क व इतर आवश्यक माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

Advertisement

ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची मुदत  27 मार्च ते 16 एप्रिल 2026 दरम्यान राहणार आहे. तसेच प्रवेशपत्र (Hall Ticket) 9 जून ते 21 जून 2026 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करता येणार आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
▪️पेपर क्रमांक 1 (इयत्ता 1 ली ते 5 वी): रविवार, 21 जून 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत 
▪️पेपर क्रमांक 2 (इयत्ता 6 वी ते 8 वी): रविवार, 21 जून 2026 रोजी दुपारी 2.30 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत 

काही प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अद्ययावत माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन आयुक्त चोथे यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.