नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी - पुष्पा चित्रपटाची नायिका रश्मिका मंदाना आणि दक्षिणेकडील सुपरस्टार विजय देवरकोंडा गुरुवारी उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले. रश्मिका मंदाना कर्नाटकातील कोडवा तर विजय देवरकोंडा तेलुगू हिंदू कुटुंबातून येतात. यामुळे सकाळी तेलुगू आणि संध्याकाळी कोडवा रितीरिवाजानुसार विधी पार पडले.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.रश्मिका मंदाना कर्नाटकच्या कोडवा आणि विजय देवरकोंडा तेलुगु कुटुंबातून येतात.कोडवा रीतीरिवाजानुसार लग्नादरम्यान वधू रश्मिका मंदाना पारंपरिक साडीत दिसली.लग्नानंतर रश्मिका आणि विजयने इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केला.
रश्मिका ही सोशल मीडियावर 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाते. उदयपूरमधील हॉटेल मेमेटोस एकायामध्ये लग्नाच्या विधींसाठी गुलाब, ऑर्किड, ट्यूलिप फुलांनी सजावट करण्यात आली होती. कच्च्या केळी आणि त्याच्या मोठ्या पानांनी मंडप सजवण्यात आला आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच विधी सुरू झाले होते. लग्नानंतर वराचे कुटुंबीय हॉटेलबाहेर आले आणि मिठाई वाटून गेले.बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलेले वधू-वर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. रश्मिका रणवीर कपूरच्या विरुद्ध 'ॲनिमल' चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. तर विजयने बॉलिवूडच्या 'लायगर' नावाच्या चित्रपटात काम केले आहे.
या साउथ स्टार्सचे लग्न तेलुगु रितीरिवाजानुसार झाले. यानंतर वराच्या बाजूच्या लोकांनी हॉटेलबाहेर मिठाई वाटली. स्टायलिस्ट श्राव्या वर्मानेही हळदीचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तेलुगु अभिनेता, दिग्दर्शक थारुण भास्कर धास्यामही दिसत आहेत. नवरदेव-नवरीची हळद आणि मेहंदीची रस्म काल (बुधवारी) झाली होती. हळदीचे फोटोही दोघांनी त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले होते.
हे लग्न दोन्ही स्टार्सनी खूप खासगी ठेवले होते. दोघांचे कुटुंब, नातेवाईक आणि फक्त खास मित्रमंडळी मिळून सुमारे २०० पाहुणेच लग्नात सहभागी झाले. पाहुण्यांसाठी जेवणात साऊथ इंडियन आणि पंजाबी जेवणासोबतच जपानी पदार्थ बनवले होते. हिंदी चित्रपट अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांनी रश्मिका आणि विजयला आपल्या इन्स्टा अकाउंटवर लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या लग्नात फक्त त्यांचे खास मित्र उपस्थित राहिले आहेत, ज्यामध्ये तेलुगू अभिनेता-दिग्दर्शक राहुल रविंद्रन, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा, दक्षिण भारतीय चित्रपटांतील अभिनेत्री आशिका रंगनाथ, तेलुगू चित्रपटांचे दिग्दर्शक तरुण भास्कर, अभिनेत्री ईशा रेब्बा आणि स्टायलिस्ट श्रव्या वर्मा यांच्या नावांचा समावेश आहे. सर्वजण हळदी आणि मेहंदी समारंभातही उपस्थित होते.
सर्वत्र त्यांच्या लग्नाच्या फोटांची चर्चा असतानाच त्यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा लग्नानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत. दोघांचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी रश्मिकाने लाल रंगाचा पारंपरिक पंजाबी ड्रेस घातला होता. तर विजयने को-ऑर्ड सेट घातला होता. दोघे एकमेकांचा हात पकडून माध्यमांसमोर आले. त्यांनी हात जोडून सर्वांना नमस्कार केला.
या दोघांचे रिसेप्शन ४ मार्च २०२६ रोजी हैदराबाद येथील ‘ताज कृष्णा’ हॉटेलमध्ये होणार आहे, ज्यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांची पहिली भेट ‘गीता गोविंदम’ (२०१८) या चित्रपटाच्या सेटवर झाली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने आणि केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर ‘डिअर कॉम्रेड’ (२०१९) मध्ये त्यांनी पुन्हा एकदा एकत्र काम केले. या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे त्यांच्यातील प्रेमाची चर्चा सुरू झाली.