मोदी सरकारचे महाराष्ट्राला गिफ्ट... मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार...

Share:
Main Image
Last updated: 21-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - व्हीबी-जी रामजी (विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी-ग्रामीण) योजनेंतर्गत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट हे १३०० लाख मनुष्य दिवसावरुन १६०० लाख मनुष्य दिवस करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

Advertisement

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी हा निर्णय ग्रामीण विकास विभागाच्या उच्चाधिकार समितीत घेण्यात आला. केंद्र सरकारचे ग्रामीण विकास विभागाचे सचिव शैलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेत ही बैठक नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट हे १३०० लाख मनुष्य दिवसावरुन १६०० लाख मनुष्य दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा महाराष्ट्राला फार मोठा लाभ मिळणार आहे. यातून ग्रामीण भागात अनेक रोजगार संधी निर्माण होणार असून, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या कामांना सुद्धा बळकटी येईल. विशेषत: मजुरांची संख्या वाढणार असल्याने अकुशल कामगारांना त्याचा मोठा लाभ होईल. त्यामुळे या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.