सावधान! शेगाव दर्शनाला जाताय? आधी हे वाचा मग ठरवा

Share:
Main Image
Last updated: 16-Feb-2026

शेगाव, (प्रतिनिधी) १६ फेब्रुवारी - श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावी जाण्याचा मानस असलेल्या भाविकांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. दि. २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महामहीम राष्ट्रपतींचा शेगाव दौरा निश्चित झाला असून, या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या काळात भाविकांना काही मर्यादांचा सामना करावा लागणार आहे.

यात्री निवासात 'कमांडो'चा मुक्काम
राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष कमांडो पथकाची निवासाची व्यवस्था संस्थांच्या सर्व 'यात्री निवास' मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे या चार दिवसांच्या काळात सामान्य भाविकांना यात्री निवासात उतरण्यासाठी खोल्या उपलब्ध होण्यात अडचणी येऊ शकतात.

२५ फेब्रुवारीला सार्वजनिक दर्शन बंद
दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस २५ फेब्रुवारी असणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी जोपर्यंत राष्ट्रपती महोदया मंदिर परिसरात उपस्थित राहतील, तोपर्यंत सार्वजनिक दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतरच मंदिर परिसर भाविकांसाठी पुन्हा खुला केला जाईल.

प्रशासनाचे आवाहन
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने आणि मंदिर व्यवस्थापनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. २३ ते २६ फेब्रुवारी या काळात शक्य असल्यास शेगावला येणे टाळावे, जेणेकरून गर्दी आणि सुरक्षा तपासणीचा त्रास होणार नाही.

भाविकांसाठी महत्त्वाचे मुद्दे:
कालावधी: २३ ते २६ फेब्रुवारी २०२६.
दर्शन: २५ फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या उपस्थितीपर्यंत सार्वजनिक दर्शन बंद.
निवास: सर्व यात्री निवासांमध्ये कमांडोची व्यवस्था असल्याने भाविकांच्या निवासावर मर्यादा.
वाहतूक: मंदिर परिसरातील काही मार्ग सुरक्षेसाठी वळवण्यात येण्याची शक्यता.

Advertisement

Comments

No comments yet.