जियोफायनान्स ऍपवर आता विविध बँका आणि NBFCच्या या सर्व सुविधा...

Share:
Main Image
Last updated: 13-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी - जियोफायनान्स ऍपने आपल्या प्लॅटफॉर्मवर विविध बँका आणि एनबीएफसींच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) सेवा सुरू केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज भासणार नाही आणि ते एकाच अॅपवर विविध बँकांच्या एफडी योजनांची तुलना करून गुंतवणूक करू शकतील.

ऍपवर युनिटी स्मॉल फायनान्स बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि महिंद्रा फायनान्स आदी संस्थांच्या एफडी सुविधा उपलब्ध आहेत. वापरकर्ते व्याजदरांच्या आधारे पर्याय फिल्टर करू शकतात. जियोफायनान्स ऍपवर वार्षिक 8.15% पर्यंत व्याजदरांची ऑफर दिली जात आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया एंड-टू-एंड डिजिटल असून काही मिनिटांत एफडी बुक करता येते. तसेच एकात्मिक डॅशबोर्डच्या माध्यमातून परतावा, मॅच्युरिटी तारीख आणि नूतनीकरण स्मरणपत्र (रिन्यूअल रिमाइंडर) यांची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे.

जियोफायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ सुरभे एस. शर्मा म्हणाले, “एफडी हा देशातील बचतीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. मात्र, विविध एफडी योजनांची तुलना करणे आणि गुंतवणुकीचा मागोवा ठेवणे ग्राहकांसाठी अनेकदा कठीण ठरते. जियोफायनान्स ऍपच्या माध्यमातून आम्ही संशोधन, तुलना, बुकिंग आणि ट्रॅकिंगची संपूर्ण प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि डिजिटल करत आहोत, जेणेकरून वापरकर्ते आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार अधिक चांगले निर्णय घेऊ शकतील.”

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.