या सरकारी भरतीची अंतिम निवड यादी जाहीर...

Share:
Main Image
Last updated: 12-Feb-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १२ फेब्रुवारी - नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गातील २८४ पदांच्या भरतीसाठी आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत माहे जुलै-२०२५ मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल २० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. 

या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती निवड यादी, प्रतीक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर १० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक वर्ग-१ महेंद्र एस. महाबरे यांनी दिली आहे.

शिपाई ‘गट-ड’ संवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनासाठी बोलावण्यात येणार असून, समुपदेशनाचे स्थळ व दिनांक लवकरच नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.