एसटीचे कार्ड असणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर... आता ही सुविधा मोबाईलमध्येच...

Share:
Main Image
Last updated: 18-Sep-2026

 

 

अक्षय काळे, मुंबई (१८ सप्टेंबर २०२६) -

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल प्रवासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि सोयीस्कर सुविधा सुरू करण्यात आली आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) धारकांना आता 'भीम ॲप' (BHIM App) द्वारे थेट घरबसल्या आपल्या कार्डमध्ये टॉप-अप (रिचार्ज) करता येणार आहे.

कसे कराल 'भीम ॲप'वरून टॉप-अप?

क्यूआर कोड स्कॅन करा:
 तुमच्या NCMC कार्डच्या पाठीमागे दिलेला QR Code भीम ॲपद्वारे स्कॅन करा.

रक्कम भरा:
 स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या सुलभ सूचनेनुसार हवी ती रक्कम निवडून थेट पेमेंट करा.

Advertisement

तत्काळ शिल्लक जमा:
रक्कम भरताच कार्डमध्ये टॉप-अप पूर्ण होईल.

ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना मोठा दिलासा

NCMC प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे.

कार्डमधील शिल्लक संपल्यानंतर रिचार्ज करण्यासाठी प्रवाशांना बस स्थानक किंवा केंद्रावर रांगेत उभे राहावे लागत होते.

आता १५ सप्टेंबर २०२६ पासून भीम ॲपवर ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे ‘डिजिटल प्रवासी सेवा, अधिक सुलभ प्रवास’ या ध्येयाला मोठी गती मिळणार आहे.

 

Advertisement

Comments

No comments yet.