डोंगरगावच्या विद्यार्थ्यांनी थेट फ्रेंच भाषेतून मांडला सहलीचा अनुभव... शिक्षणमंत्री भुसे सुद्धा झाले चकित...

Share:
Main Image
Last updated: 17-Sep-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १७ सप्टेंबर - विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आणि त्यांना उत्तम दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकसह राज्यातील ५ ते ६ जिल्ह्यांत ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’ सुरू करण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केली. नाशिक जिल्हा परिषदेत भेट देऊन 'ज्ञानयात्री' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान ते बोलत होते.

नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या ‘ज्ञानयात्री’ या शैक्षणिक सहल उपक्रमाचे शिक्षणमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचा आनंद घेतला आहे.

'आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी':

खेळाडूंच्या कौशल्यविकासासाठी, योग्य मार्गदर्शन आणि अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रबोधिनी सुरू केली जाणार आहे.

झेडपीच्या विद्यार्थ्यांची 'फ्रेंच'मध्ये छाप:

Advertisement

दौऱ्यादरम्यान निफाड तालुक्यातील डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी फ्रेंच भाषेतून आपल्या सहलीचा अनुभव शिक्षणमंत्र्यांसमोर मांडला. डोंगरगाव शाळेतील २० विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील फ्रेंच भाषा परीक्षा उत्तीर्ण केली असल्याचे समजताच मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अनुभवातून शिक्षणाला प्रोत्साहन:

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा वाढवणे, इतिहास, संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणे यासाठी 'ज्ञानयात्री' उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून शाळा, शिक्षक, पालक आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी यावेळी केले. या प्रसंगी सीईओ ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.