मोठा कट? 'विमानाचा स्फोट घडवण्यासाठीच मुद्दाम...' रोहित पवारांचा खळबळजनक आरोप... (बघा व्हिडीओ)

Share:
Main Image
Last updated: 18-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाला एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या अपघातामागे मोठा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. "विमानाचा स्फोट करण्यासाठीच वैमानिकाने विमान मुद्दाम खाली आदळले," असा खळबळजनक आरोप करत रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे.

जादा इंधन आणि अतिरिक्त कॅन: घातपाताचा संशय?
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत विमानातील इंधनाच्या साठ्यावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, "मुंबई ते बारामती या प्रवासासाठी फार इंधनाची गरज नव्हती. तरीही विमानातील टाक्या पूर्ण भरल्या होत्या. अपघाताच्या वेळी विमानात सुमारे ३००० ते ३५०० लिटर इंधन होते. धक्कादायक म्हणजे, विमानातील टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅन का ठेवले होते? इंधन जास्त असेल तर मोठा स्फोट होईल, या उद्देशानेच हे सर्व केले गेल्याचा आमचा संशय आहे."

वैमानिक आणि 'व्हिजिबिलिटी'वर प्रश्नचिन्ह
अपघाताच्या दिवशी बारामतीमध्ये हवामान खराब होते आणि दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी होती. यावर बोट ठेवत रोहित पवार म्हणाले:
विमान उतरवण्यासाठी किमान ५००० व्हिजिबिलिटी आवश्यक असते, मात्र बारामतीत ती केवळ ३५०० होती.
दृश्यमानता कमी असताना वैमानिक सुमित कपूर याने विमान माघारी न फिरवता लँडिंगचा प्रयत्न का केला?
विमान एक गिरकी घेऊन मुद्दाम जमिनीवर आदळले गेले आणि स्फोट घडवून आणला.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? कंपनीवरही गंभीर आरोप
रोहित पवार यांनी केवळ वैमानिकावरच नव्हे, तर विमान सेवा देणाऱ्या व्हीएसआर (VSR) कंपनीवरही निशाणा साधला आहे.
"व्हीएसआर कंपनीचा 'गोपी' नावाचा हँडलर मुंबईतून फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करू शकतो. सध्या तपास सुरू असताना कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. कंपनी पुराव्यांशी छेडछाड आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहे," असा दावा पवारांनी केला.
तसेच, दिल्लीवरून आलेल्या मूळ फ्लाईट प्लॅनमध्ये आणि हँडलरने केलेल्या बदलांमध्ये तफावत असू शकते, त्यामुळे या प्रकरणातील ई-मेल्सची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आज पुन्हा होणार 'गौप्यस्फोट'
या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, रोहित पवार आज पुन्हा एकदा काही नवे पुरावे किंवा माहिती समोर आणण्याची शक्यता आहे. या आरोपांमुळे आता अजित पवार अपघात प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.