नाशिकचे महापौर आणि उपमहापौर ठरले... मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 03-Feb-2026

 

 

​नाशिक, (प्रतिनिधी) दि. ३ फेब्रुवारी २०२६ - नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. भाजपने महापौरपदासाठी माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. नाशिक महापालिकेत ७२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपचे हे दोन्ही उमेदवार बिनदिक्कतपणे निवडून येतील हे स्पष्ट झाले आहे.

 

​सिंहस्थाचा विचार करून अनुभवी नेतृत्वाला संधी

​आगामी २०२६-२७ चा सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता, प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या आणि सुशिक्षित नेतृत्वाची गरज होती. हिमगौरी आडके-आहेर या बी.ई. (आयटी) आणि एम.बी.ए. पदवीधारक आहेत. २०१७-१८ मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सभापती म्हणून प्रभावी काम केले आहे. त्यांना राजकीय वारसा लाभला असून, साधू-महंत आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यात त्या यशस्वी ठरतील, या विश्वासाने पक्षाने त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घातली आहे. हिमगौरी आहेर-आडके या दिवंगत भाजप नेते दौलतराव आहेर यांच्या कन्या आहेत. दौलतराव आहेर हे भाजपचे अत्यंत निष्ठावान पदाधिकारी होते. त्यांनी आरोग्यमंत्रीपदाची धुराही सांभाळली होती. तसेच, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर हे हिमगौरी यांचे बंधू आहेत.

 

​मच्छिंद्र सानप यांना उपमहापौरपदाची लॉटरी

​उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा करून पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. सानप यांनी प्रभागातील विकासकामे आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. या निवडीमुळे भाजपच्या अंतर्गत गोटात आनंदाचे वातावरण आहे. मच्छिंद्र यांचे वडिल बाळासाहेब सानप हे भाजपचे निष्ठावंत आहेत. बाळासाहेब सानप यांनी नाशिकचे महापौरपद भूषविले आहे. तसेच, ते आमदारही राहिले आहेत.

 

​बहुमताचा आकडा:
१२२ सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे ७२ नगरसेवकांचे संख्याबळ आहे
, त्यामुळे महायुतीला इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज उरलेली नाही.

​नियोजित निवडणूक:
६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेत अधिकृत निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

​राजकीय समीकरण:
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व ७२ नगरसेवकांची बैठक घेऊन या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.