नाशिक, (प्रतिनिधी) ३० जानेवारी - सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या वर्दळीच्या द्वारका सर्कल भागात अंडरपासचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी चार प्रमुख रस्ते व सात उप-रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या भागात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या भागातील वाहन कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने उद्या (दि.३०) पासून तीन महिन्यांसाठी सर्व प्रकारची अवजड वाहने, खाजगी प्रवासी बसेस, एसटी बसेस, सिटीलींक बसेस आदींना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
अवजड वाहनांना 'पयार्यी मार्ग'
नाशिक रोडकडून मुंबईकडे जाणारे अवजड वाहनांकरीता मार्ग (फक्त रात्री १०.०० ते सकाळी ०८.००)
मुंबईकडे जाण्याचा मार्ग - सिन्नर फाटा दत्तमंदिर सिग्नल हॉटेल - वडाळागांव सर्कल साईनाथ सिग्नल डावीकडे वळुन गरवारे पॉईंट मार्गे एनएच-३ महामार्गने मुंबईकडे जातील. फेम सिग्नल डावीकडे वळुन रविशंकर मागार्ने -आठवण कलानगर सिग्नल पाथर्डी गांव सर्कल - पाथर्डी फाटा मार्गे मार्गस्थ होतील.
सिन्नरकडे जाण्याचा मार्ग पाथर्डी फाटा पाथर्डी गांव सर्कल डावीकडे कलानगर सिग्नल साईनाथनगर सिग्नल-वडाळागांव सर्कल - रहमतनगर आठवण हॉटेल- देवरे पेट्रोल पंप संगठा कॅसल डावीकडे वळुन रविशंकर मागार्ने फेम सिग्नल - उजवीकडे वळून पुणारोडने सिन्नरकडे जातील.
एस.टी. बसेससाठी मार्ग
१) नाशिक रोडकडून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेस:-
मुंबईकडे जाणारा मार्ग - सिन्नर फाटा दत्तमंदिर सिग्नल सम्राट सिग्नल येथे डावीकडे वळुन संत सावता माळी मागार्ने म्हाडा कॉलनी वडाळा- कलानगर सिग्नल लेखानगर उजवीकडे बालभारती सर्व्हिसरोडने जॉगींग ट्रॅक मुंबईनाका सर्कल - महामार्ग बस स्थानक येथुन परत मुंबईनाका सर्कल इंदिरानगर जॉगींग ट्रॅक हायवे मार्गे पाथडीर्फाटा - पुढे मुंबईकडे जातील
सिन्नरकडे जाणारा मार्ग महामार्ग बस स्थानक मुंबईनाका सर्कल-उजवीकडे सर्व्हिसरोडने इंदिरानगर बोगदा डावीकडे वळुन जॉगींग ट्रॅक - हॉटेल एनराईज साईनाथ सिग्नल वडाळागांव सर्कल रहमतनगर आठवण हॉटेल - देवरे पेट्रोल पंप - संगठा कॅसल, मदिना चौक डावीकडे वळुन डीजीपीनगर सम्राट सिग्नल उजवीकडे पुनारोडने सिन्नरकडे जातील.
२) पुण्याकडून नाशिक, त्र्यंबकेश्वर कडे येणारा-जाणारा पयार्यी (एस.टी. बसेससाठी) -
सिन्नर कडुन ठक्कर बस स्टॅण्ड येण्याचा मार्ग सिन्नर फाटा दत्तमंदीर सिग्नल सम्राट सिग्नल डीजीपी नगर रोडने - वडाळागाव - कला नगर सिग्नल लेखानगर (हॉटेल मॅन्ड रिओ) इंदीरानगर बोगदा डावीकडे वळुन - सीसीएम सिग्नल उजवीकडे वळुन - उंटवाडी रोड संभाजी चौक भवानी सर्कल जलतरण तलाव सिग्नल ठक्कर बस स्टॅण्ड/मेळा स्टॅण्ड - नाशिक येथे येतील.
ठक्कर बाजार/मेळा स्टॅण्ड येथुन सिन्नर मार्गे पुण्याकडे जाण्याचा मार्ग ठक्कर बाजार बस स्टॉप मोडक सिग्नल-गडकरी सिग्नल - मुंबईनाका सर्कल इंदीरानगर बोगदा डावीकडे वळुन जॉगींग ट्रॅक साईनाथ नगर सिग्नल-रविशंकर मार्ग - फेम सिग्नल नाशिक रोड सिन्नर फाटा मार्गे पुणे कडे जातील.
निमाणी बस स्थानक येथून सुटणाऱ्या एस.टी. बससाठी-
१) मुंबईकडून नाशिक मार्गे धुळे बाजूकडे जाणारे व येणारे (एस.टी. बस करीता ) :-
मुंबईकडून नाशिककडे येण्याचा मार्ग: मुंबई कडुन गरवारे टी पॉईंट उड्डाणपुलावरून- लेखानगर उड्डाणपुलावरून, इंदिरानगर बोगदा येथे खाली उतरून डावीकडे सीसीएम सिग्नल एबीबी सिग्नल पुढे सरळ महात्मानगर - जेहान सर्कल डावीकडे हुतात्मा चौक जुनागंगापुर नाका डावीकडे चोपडा लॉन्स ड्रीम कॅसल सिग्नल-डावीकडे मखमलाबाद टी पॉईंट कृषी उ. बाजार सिग्नल तारवाल सिग्नल उजवीकडे वळुन दिंडोरी नाका निमाणी बस स्थानक येतील व पुढे धुळे करीता निमाणी बस स्थानक काटया मारूती सिग्नल संतोष टी पॉईंट सिग्नल येथुन एनएच-३ महामागार्ने अमृतधाम चौक- रासबिहारी मार्गे जातील.
२) पुण्याकडुन धुळे, मालेगाव गुजरात, पेठ, दिंडोरी बाजु कडे जाणारे वाहने (एस.टी. बस करीता) :-
निमाणी नाशिककडे येण्याचा मार्ग सिन्नर फाटा बिटको चौक उजवीकडे जेलरोड मार्गे नांदुरनाका - डावीकडे मिरचे सिग्नल - स्वामीनारायण चौक डावीकडे संतोष टी पॉईंट उजवीकडे काटयामारूती सिग्नल मार्गे निमाणी बस स्थानकाकडे येतील.
3) पुण्याकडे जाण्याचा मार्ग - निमाणी बस स्थानक काटयामारूती सिग्नल - संतोष टी पॉईंट- स्वामीनारायण चौक उजवीकडे मिरची सिग्नल - नांदुरनाका जेलरोड मार्गे बिटको चौक-सिन्नर फाटा मार्गे पुणेकडे जातील.
निमाणी बस स्टॅण्ड येथून सुटणाऱ्या (एस.टी. बससाठी) -
निमाणी बस स्टॅण्ड येथून धुळे, मालेगांव, छ. संभाजीनगर, दिंडोरी, पेठ, वणी, कळवण, सटणा, देवळा, पिंपळगांव बसवंत, चांदवड, सुरगाणा या ठिकाणी जाणे करीता निमाणी नाशिक येथुन एस. टी. बस आगाराच्या बसेस सुटणार आहेत.
सिटीलिंक बसेसकरीता येणारे जाणारे मार्ग
१) शालीमार ते नाशिकरोड जाण्याचा मार्ग शालीमार खडकाळी सिग्नल सारडा सर्कल उजवीकडे नॅशनल उर्दू शाळेकडुन मदिना चौक कोर्टयार्ड हॉटेल डावीकडे वळुन वडाळानाका उजवीकडे नागजी सिग्नल अशोका सिग्नल-फेम सिग्नल मार्गे नाशिक रोड कडे जातील.
२) नाशिकरोड ते शालीमारकडे येण्याचा मार्ग नाशिकरोड फेमसिग्नल अशोकामार्ग सिग्नल भारतनगर - नागजी सिग्नल - वडाळा नाका - मुंबईनाका सर्कल मदिना चौक नॅशनल उदुर्शाळा- सारडा मार्गे शालीमार कडे जातील.
सिटीलिंक बस स्थानक तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल्स निमाणी बस स्टॅण्ड येथुन सुटणाºया सर्व सिटीलिंक बसेस या तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल्स येथुन सुटणार आहेत.
लाईट व्हेईकलसाठी (हलके वाहन) येणारे- जाणारे मार्ग-
१) पुण्याकडुन मुंबईकडे जाणारे हलके वाहन-
सिन्नर फाटा-रेल्वे क्रॉसिंग बागुल नगर-विहीतगांव सिग्नल वडनेर रोड- वडनेर गेट- पाथडीर्गांव सर्कल- पाथर्डी फाटा गरवारे मार्गे मुंबईकडे जातील.
२) पुण्याकडुन त्रंबकेश्वरकडे जाणारे हलके वाहन-
सिन्नर फाटा-रेल्वे क्रॉसिंग बागुल नगर-विहीतगांव सिग्नल वडनेर रोड- वडनेर गेट- पाथडीर्गांव सर्कल- पाथर्डी फाटा अंबडगांव- एक्सलो पॉईंट मार्गे त्रंबकेश्वरकडे जातील
३) मुंबईनाका कडुन नाशिकरोड कडे जाणारे हलके वाहन-
मुंबईनाका - गारवा बियार्णी- भाभानगर- नागझी सिग्नल- काठेगल्ली सिग्नल मार्गे नाशिक रोड
४) नाशिकरोड कडुन पंचवटी कडे जाणारे हलके वाहन-
फेम सिग्नल - मेट्रो मॉल जक्शन डावीकडे वळुन ट्रॅक्टर हाउस मार्गे पंचवटी कडे जातील.
हाईट बॅरिअर पॉईंट
१) काठे गल्ली सिग्नल
२) वडाळा नाका
३) फेम सिग्नल
४) ट्रॅक्टर हाउस
५) सारडा सर्कल
६) धुळे बाजूकडील डाउन रॅम्प
७) मुंबई बाजूकडील डाउन रॅम्प