पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलांनी केला हा धक्कादायक प्रकार...

Share:
Last updated: 23-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जानेवारी - पाणी मागण्याचा बहाणा करून घरात शिरलेल्या चोरट्या महिलांनी रोकडवर डल्ला मारला. दिंडोरीरोडवरील लामखेडेमळा भागात ही घटना घडली असून, या घटनेत बेडरूममधील कपाटात ठेवलेली आठ हजाराची रोकड हातोहात लांबविण्यात आली आहे.  याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्दांत रमेशराव धनले (रा.श्री गणेश अपा. लामखेडे मळा, दिंडोरीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

धनले यांचा लहान मुलगा देवांश हा गुरूवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास आपल्या घरात एकटा असतांना ही घटना घडली. दारात उभ्या असलेल्या दोन अनोळखी महिलांनी त्याच्याकडे पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. यावेळी मुलाने दोन्ही महिलांना घरात घेतले. मुलगा पाणी घेण्यासाठी किचनमध्ये गेला असता दोघींपैकी एकीने बेडरूममध्ये शिरून कपाटात ठेवलेली रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.

किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांची मारहाण

नाशिक : किरकोळ कारणातून शेजाऱ्यांनी महिलेस मारहाण केल्याची घटना शिखरेवाडी भागात घडली. या घटनेत एकाने पिडीत महिलेचा विनयभंग केला असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगदिश नागरे, सविता नागरे, अनिकेत नागरे, आदित्य नागरे (रा. सर्व पासपोर्ट आॅफिससमोर , शिखरेवाडी कॉर्नर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या बुधवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास ती सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेली असता ही घटना घडली. शेजारी राहणाºया संशयित नागरे कुटूंबियांच्या ड्रेनेजचे पाणी सोसायटीच्या पार्किगमध्ये  येत असल्याने तिने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता ही हाणमारी झाली. संशयित कुटू्बियांनी महिलेस शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. या घटनेत एकाने गळा चिरून ठार मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास जमादार बकाल करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.