नाशिकच्या तरुण रंगकर्मींनी सुरू केले स्पॉटलाईट थिएटर... १ नोव्हेंबरला होणार ‘श्योक’ नाटकाचे दोन विशेष प्रयोग

Share:
Main Image
Last updated: 30-Oct-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० ऑक्टोबर - प्रेम, विरह, स्मृती, सीमाविभाजन आणि मानवी नात्यांचा संवेदनशील वेध घेणारे ‘श्योक’ हे नाटक नाशिककर रसिकांसाठी स्पॉटलाइट थिएटरच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. भ मॅगझीन प्रस्तुत या नाटकाचे रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आणि रात्री ८ वाजता असे दोन विशेष प्रयोग होणार आहेत. हे प्रयोग स्पॉटलाइट थिएटर, मिको हॉल, संभाजी स्टेडियमजवळ, नाशिक येथे पार पडतील.

लडाखमधील तुर्तुक परिसराच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेले हे नाटक युद्ध, प्रेम, विरह आणि सीमाविभाजनाच्या पलीकडे जाणाऱ्या मानवी भावभावनांचा वेध घेते. भूषण संजय पाटील आणि त्सेरिंग ल्हामो यांनी या नाटकाचे लेखन केले असून, भूषण संजय पाटील यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून स्पॉटलाइट थिएटरच्या माध्यमातून नाशिकमध्ये अनेक नामवंत, दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण नाटकांचे प्रयोग आयोजित केले जात आहेत. प्रायोगिक रंगभूमीला व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच नाशिककर रसिकांना वेगळ्या आशयाचे आणि दर्जेदार नाट्यप्रयोग अनुभवता यावेत, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

सचिन राहणे, नीलेश सूर्यवंशी, चेतन बर्वे, भूषण भावसार, अतुल गायकवाड आणि नितीन साळुंखे हे स्पॉटलाइट थिएटरचे तरुण रंगकर्मी नाशिकच्या सांस्कृतिक आणि नाट्यचळवळीत सक्रिय योगदान देत आहेत. प्रायोगिक नाटकांना प्रोत्साहन देणे, नवनवीन नाट्यप्रयोग रसिकांपर्यंत पोहोचवणे आणि शहरातील नाट्यसंस्कृती अधिक समृद्ध करणे, या दिशेने स्पॉटलाइट थिएटरचे प्रयत्न सुरू आहेत.

नाशिककर रसिकांनी या विशेष नाट्यप्रयोगाला उपस्थित राहून ‘श्योक’ या संवेदनशील नाट्यानुभवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्पॉटलाइट थिएटरच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रयोगाची माहिती :

 नाटक : श्योक

 सादरकर्ते : भ मॅगझीन

 दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६

 वेळ : सायंकाळी ५.३० वाजता व रात्री ८ वाजता

 स्थळ : स्पॉटलाइट थिएटर, MICO हॉल, संभाजी स्टेडियमजवळ, नाशिक

Comments

No comments yet.