नाशिक, (प्रतिनिधी) २५ ऑक्टोबर - समाजातील जनमनाच्या स्पंदनांचा वेध घेत निर्भीडपणे बातम्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मराठी पत्रकार संघाच्या नाशिक शाखेची नुकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्षपदी रविंद्र अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा, महानगर आणि तालुका कार्यकारिणीही घोषित करण्यात आली.
पत्रकारिता करताना पत्रकारांना अनेकदा धकाधकीच्या जीवनशैलीचा सामना करावा लागतो. समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडताना पत्रकारांच्या स्वतःच्या समस्या मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतात. पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करणे, त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठवणे, तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हा संघटनेच्या कार्याचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे.
या माध्यमातून पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना प्रभावीपणे कार्यरत राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी आणि उपाध्यक्ष विवेक इमानदार, संपादक अभिजीत कुलकर्णी, संपादक राहुल रनाळकर, जेष्ठ पत्रकार संजय पाठक, सुधीर कुलकर्णी, नरेंद्र जोशी, धनंजय वाखारे यांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत नाशिक शाखेच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रविंद्र अमृतकर यांच्यासह घोषित करण्यात आलेल्या जिल्हा, महानगर आणि तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य जिल्ह्याच्या विविध भागांत विस्तारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यकारणी मध्ये सदस्य पदी विविध वर्तमानपत्र व डिजिटल न्यूज चैनल मधील प्रमुख पत्रकारांचा समावेश आहे.
जिल्हा कार्यकारिणी अशी
अध्यक्ष : रवींद्र अमृतकर
कार्यकारी अध्यक्ष: संजय पाठक
सरचिटणीस: भूषण महाले
उपाध्यक्ष : प्रवीण ठाकरे
चिटणीस : विक्रांत मते
कोषाध्यक्ष : ज्ञानेश्वर वाघ
कार्यकारणी सदस्य
श्याम बागुल
अनिकेत साठे
विनोद बेदरकर
विनोद पाटील
मनोज घोणे
आसिफ सय्यद
हेमंत भोसले
मुकुंद पिंगळे
विकास भुजबळ
जितेंद्र तरटे
महानगर कार्यकारिणी :
सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष
चारुशीला कुलकर्णी, उपाध्यक्ष
सचिन जैन, सरचिटणीस
पीयुष नाशिककर चिटणीस
मनोज मालपाणी
संकेत शुक्ल
नरेंद्र जोशी
मेधा बुरकुले
जहीर शेख
विठ्ठल भाडमुखे
सचिन वाघ
प्रदीप सातपुते
श्रीकृष्ण कुलकर्णी
विराम गांगुर्डे
धनंजय वाखारे
तालुका अध्यक्ष
राजाभाऊ देशपांडे, सिन्नर
शंकर वाघ, मालेगाव
सुरेश सलादे, चांदवड
योगेंद्र वाघ, येवला
कमलाकर अकोलकर, त्र्यंबकेश्वर
संजय देवरे, देवळा
राजेंद्र तळेकर, नांदगांव